SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नाना पाटेकर की कॅप्टन स्मित मच्छर? मुंबईच्या नवीन उड्डाणपुलाच्या नावावरून वाद

मुंबईतील एका नवीन उड्डाण पुलाच्या उद्घाटनापूर्वीच त्याच्या नावावरून वाद रंगला आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप यांच्यामध्ये नावावरून वाद सुरू झाला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 18, 2026, 04:03 PM IST | Updated: Oct 18, 2026, 04:14 PM IST
Image Credit: Mumbai Vidyavihar Flyover
Join

मुंबईतील विद्याविहार पुलाच्या नावावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे गटाला या नवीन उड्डाणपुलाला अभिनेता पद्मश्री नाना पाटेकर यांचं नाव असावं असं वाटतंय. पक्षाच्या नेत्यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट घेतली आणि त्यांना मागणी केली की, या पुलाला नाना पाटेकर यांचं नाव द्यावे. महत्त्वाचे म्हणजे त्यांची ही इच्छा त्यांनी चक्क पुलाच्या उद्घाटनापूर्वी 'पद्मश्री दिवंगत नाना पाटेकर सेतू' असा फलक लावला आहे. ज्यामुळे हा वाद अधिक चिघळला आहे. तरदुसरीकडे भाजप आमदार पराग शाह यांनी पुलाला कॅप्टन स्मित मच्छर असं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे. या दोन मागण्यांमुळे पुलाच्या नावाचा वाद रंगला आहे.

भाजप आमदार पराग शाह यांनी विद्याविहार पुलाला कॅप्टन स्मित मच्छर यांचं नाव द्यावं यासाठी एक पत्र लिहिलंय आहे. या पत्रात लिहिलंय की, कॅप्टन मच्छर यांनी फ्लायदुबईच्या विमानावरील हवेतील अपहरणाचा एक हिंसक प्रयत्न हाणून पाडला होता, ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली आहे. त्यामुळे या विद्याविहार पूलाला मच्छर यांचं नाव देण्यात यावं. भाजप नेत्याच्या या मागणीनंतर, पुलाच्या नावाबाबत दोन्ही पक्षांमध्ये विविध प्रस्ताव समोर आलाय. नावाबाबतचा अंतिम निर्णय आता महानगरपालिका स्तरावर घेण्यात येणार असून मुंबई महानगरपालिकेने या मागणीवर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाहीय. 

दरम्यान, महानगरपालिकेतील सभागृह नेते गणेश खंकर यांनी आरोप केला आहे की, शिवसेनेवर वाद निर्माण करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. खंकर म्हणाले की, नाना पाटेकर हे देशातील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहेत. पुलाला त्यांचे नाव देण्याऐवजी त्यांच्या नावाने एखाद्या मोठ्या नाट्यगृहाला किंवा नाट्य संकुलाला नाव देणे अधिक योग्य ठरेल, असंही त्यांनी यावेळी सूचना केली आहे. 


ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर 2026 रोजी गोव्यात वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. तर सप्टेंबर 2026 मध्ये फ्लायदुबईच्या विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याच्या धाडसी कृत्यानंतर कॅप्टन स्मित मच्छर यांचं जगभरात कौतुक होतंय. दरम्यान विद्याविहार पूलाचे लवकर उद्घाटन होणार असून ते प्रवाशांसाठी खुल करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या पूलाला कोणाचे नाव देण्यात येईल हे पाहावं लागणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES