• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबईकरांवर पाणीसंकट! मंगळवारी 10 तास नळाला नसणार पाणी

दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबईकरांवर पाणीसंकट! मंगळवारी 10 तास नळाला नसणार पाणी

दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मंगळवारी 10 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कोणत्या भागावर परिणाम होणार आहे, जाणून घ्या.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 02, 2026, 12:15 PM IST|Updated: Nov 02, 2026, 12:23 PM IST
joinshare
दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबईकरांवर पाणीसंकट! मंगळवारी 10 तास नळाला नसणार पाणी
Image Credit: navi mumbai on 3 nov water supply

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
सप्तपदी झाली, थाटात लग्न झालं घरी जाण्याऐवजी वधू-वरासह 27 वऱ्हाडी हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?

सप्तपदी झाली, थाटात लग्न झालं घरी जाण्याऐवजी वधू-वरासह 27 वऱ्हाडी हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?

2

बापानेच आपल्या 10 वर्षीय मुलाची केली हत्या, नंतर त्याच्या बाजूला झोपून...; तपासात धक्कादायक खुलासे, आई आली तेव्हा तो..., कुटुंबीय हादरले

3

माधुरी, अजिंक्य रहाणेसह अनेक सेलेब्रिटींचे व्हिडिओ, पण अमित साटमांचा दियाच्याच व्हिडीओवर आक्षेप का? त्या विधानांमुळे होतोय विरोध?

4

'नरेंद्र मोदींना जाऊ देणार नाही, तिहार जेलच्या...'; संजय राऊतांचं मोठं विधान, 'त्यांच्यावर खटला चालेल'

5

दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबईकरांवर पाणीसंकट! मंगळवारी 10 तास नळाला नसणार पाणी

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळी गुरुवारी 5 नोव्हेंबरपासून सुरू होतेय. घरोघरी दिवाळीची लगबग सुरु आहे. घराची साफसफाई आणि फराळाची तयारीमध्ये महिला व्यस्त आहेत. स्वच्छा असो किंवा फराळाची लगबग यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असतं. अशातच नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मंगळवारी 3 नोव्हेंबरला नवी मुंबईत 10 तास पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. यामुळे आता दिवाळी तयार करताना पाण्याचे संकट नवी मुंबईकरांवर ओढवलं आहे. 

या कारणामुळे पाणीपुरवठा बंद राहणार!

मंगळवारी नवी मुंबई महापालिकेकडून मुख्य जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आलं आहे. या मुख्य जलवाहिन्यांवर विविध ठिकाणी व्हॉल्व्ह बसवण्यात येणार आहे. त्यामुळे सानपाडा, वाशी, बेलापूर आणि शिरवणे परिसरात हे तांत्रिक कामं असणार आहे. नवी मुंबई महापालिकेने माहिती दिली आहे की, सानपाडा मोराज सर्कलजवळील मुख्य जलवाहिनीवर 400 मिमी व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह तर सानपाडा सेक्टर 30 इथल्या सामाना प्रेसजवळील जलवाहिनीवर 250 मिमी व्यासाचा स्लुईस व्हॉल्व्ह लावण्यात येणार आहे. शिवाय  वाशी सेक्टर 19 - सतरा प्लाझा, सेक्टर 29, वाशी, बेलापूर सेक्टर 29 इथेदेखील व्हॉल्व्ह  बसवण्यात येणार आहे.

किती वाजता पाणी जाणार?


नवी मुंबई महापालिकेने घोषणा केली आहे की, मंगळवारी  3 नोव्हेंबरला सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत नळाला पाणी नसणार आहे. ऑफिस, कॉलेज असो शाळेची घाई असताना नळाला पाणी नसल्याने घरात महिलांची तारांबळ उडणार हे नक्की. 

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे?

पाणीपुरवठा दहा तास बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि खारघर, कामोठे ऐरोली या विभागांतील बंद राहणार आहे. तर बुधवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, त्यामुळे नवी मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.

बीडीडी चाळ पुनर्विकास लॉटरी प्रकरण!

ना. म. जोशी बीडीडी चाळ पुनर्विकासातील नवीन घराच्या चावी वाटप 6 नोव्हेंबरला होणार आहे. या चावी वाटपापूर्वी लॉटरीसंदर्भात 4 नोव्हेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. इथल्या चार चाळींच्या लॉटरीवर रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे. तर गेल्या वर्षी न्यायालयाने या सोडतीला स्थगिती दिली होती. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Breaking News