• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'नरेंद्र मोदींना जाऊ देणार नाही, तिहार जेलच्या...'; संजय राऊतांचं मोठं विधान, 'त्यांच्यावर खटला चालेल'

'नरेंद्र मोदींना जाऊ देणार नाही, तिहार जेलच्या...'; संजय राऊतांचं मोठं विधान, 'त्यांच्यावर खटला चालेल'

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुठेही जाऊ देणार नाही असं विधान केलं असून, शिवसेना खासदार संजय राऊतांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे. नरेंद्र मोदींवर या देशात खटला चालेल असा दावा त्यांनी केला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 02, 2026, 12:18 PM IST|Updated: Nov 02, 2026, 12:23 PM IST
joinshare
'नरेंद्र मोदींना जाऊ देणार नाही, तिहार जेलच्या...'; संजय राऊतांचं मोठं विधान, 'त्यांच्यावर खटला चालेल'
Image Credit: संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर टीका

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
सप्तपदी झाली, थाटात लग्न झालं घरी जाण्याऐवजी वधू-वरासह 27 वऱ्हाडी हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?

सप्तपदी झाली, थाटात लग्न झालं घरी जाण्याऐवजी वधू-वरासह 27 वऱ्हाडी हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?

2

बापानेच आपल्या 10 वर्षीय मुलाची केली हत्या, नंतर त्याच्या बाजूला झोपून...; तपासात धक्कादायक खुलासे, आई आली तेव्हा तो..., कुटुंबीय हादरले

3

माधुरी, अजिंक्य रहाणेसह अनेक सेलेब्रिटींचे व्हिडिओ, पण अमित साटमांचा दियाच्याच व्हिडीओवर आक्षेप का? त्या विधानांमुळे होतोय विरोध?

4

'नरेंद्र मोदींना जाऊ देणार नाही, तिहार जेलच्या...'; संजय राऊतांचं मोठं विधान, 'त्यांच्यावर खटला चालेल'

5

दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबईकरांवर पाणीसंकट! मंगळवारी 10 तास नळाला नसणार पाणी

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुठेही जाऊ देणार नाही असं विधान केलं असून, शिवसेना खासदार संजय राऊतांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे. राहुल गांधी अगदी योग्य बोलले आहेत. आम्ही त्यांना कुठे जाऊ देणार नाही, कुठे पळू देणार नाही. मोदी इथेच राहतील, त्यांच्यावर खटले चालतील आणि त्यांची कंपनी इथेच तुरुंगात जाईल असं मोठं विधान संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना केलं आहे. भाजपाची नजर कमजोर आहे. त्यांना जवळचं दिसत नाही आणि लांबचंही दिसत नाही. त्यांना नेत्रदान करण्याची गरज आहे असं प्रत्युत्तरही त्यांनी गर्दीवरुन होणाऱ्या टीकेवर दिलं आहे.

"मोदी जाणार नाहीत हे बरोबर आहे आणि त्यांनी जाऊही नये. मोदी येथेच राहतील, तिहार जेलच्या आसपासच हे सर्व लोक राहतील. आम्ही मोदींना सोडणार नाही. देशात मागील 12 वर्षात इतके कांड केले आहेत की देश सोडून जाऊ देणार नाही. ना अमित शाह, ना ज्ञानेश कुमार यांना," असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

काँग्रसेची रॅली फ्लॉप शो असल्याची टीका भाजपाकडून होत आहे. त्यावर ते म्हणाले की, "भाजपाची नजर कमजोर आहे. त्यांना जवळचंही दिसत नाही आणि लांबचं दिसत नाही. रामलीला मैदान आम्ही डोळ्याने पाहत होतो. ते ओसांडून वाहत होतं. अनेक ठिकाणी अमित शाहांकडून गर्दी अडवण्यात आली होती. कालची रॅली यशस्वी झाली. जो संदेश द्यायचा होता तो देण्यात आला तो म्हणजे, की ज्ञानेश कुमार, मोदी आणि शाहांना जावं लागेल".

पुढे ते म्हणाले की, "ती फक्त एक गर्दी नव्हती तर संघर्ष करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते. 1974 नंतर इतकी मोठी रॅली झाली नाही. जयप्रकाश नाराणय यांनी तेव्हा लोकशाहीच्या रक्षणासाठी चलो दिल्ली घोषणा दिली होती आणि जनता रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर इतकी मोठी रॅली झालेली नाही. लोकशाही वाचवायची आणि पापी, जुलमी सरकरला हटवायचं या मुद्द्यावर 1974 मध्ये आणि आता राहुल गांधींनी आवाहन केलं ते यशस्वी झालं".

"मोदी, शाह, ज्ञानेश कुमार यांची जाण्याची वेळ आली आहे. जनता मोदींविरोधात उसळली आहे. अंधभक्तांना कोणी किंमत देत नाही. त्यांना बाहेर काय सुरु आहे माहिती नाही. झोपेच्या गोळ्या घेतात आणि सकाळी उठून काहीही बोलतात," असा टोला त्यांनी लगावला.

"राहुल गांधींना पंतप्रधान करायचं का हे अमित शाह ठरवणार नाहीत, ते जनता ठरवणार. भाजपा नेते म्हणतात हे जनेतेने निवडून दिलेलं सरकार आहे. पण ज्ञानेश कुमार यांच्या मेहरबानाने निवडून आले आहेत," अशीही टीका त्यांनी केली.  

बांगलादेशची लोकसंख्या 15 कोटी आहे आणि त्यातील 13.5 कोटी इथे कधी आले? आले असतील तर अमित शाहांचं अपयश आहे. त्यांनी तात्काळ पद सोडलं पाहिजे, मोदींनी त्यांना मुक्त केलं पाहिजे असं ते म्हणाले. लेड लडाख, अरुणाचलमध्ये चीन घुसलं आहे त्यावर बोलत नाही आणि चीनचे फंडिंग असल्याचा आरोप करता अशी टीका त्यांनी केली.

कर्जतमध्ये आता एकही झाड तुटणार नाही. 287 वं झाड तुटणार नाही, त्यांनी तोडूनच दाखवावं. आज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना, संघर्ष समिती, मनसे, काँग्रेस, एनसीपी आम्ही सगळ्यांनी कर्जत बंद करायचं ठरवलं आहे असं ते म्हणाले. तसंच मुख्यमंत्र्यांनी मनात आणलं तर पूर्णेकर प्रकरणी न्याय मिळेल. त्यांनी जर ठाण्यातील गुडंशाहीपुढे गुडघे टेकले असतील तर न्याय मिळणार नाही असा आरोप केला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sanjay Raut
PM Narendra Modi
BJP
Rahul Gandhi