SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सुनेत्रा पवारांशिवाय अमित शाहांची भेट का घेतली? राष्ट्रवादी काँग्रेसने केला खुलासा, 'अंतर्गत मतभेद...'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. मात्र यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार अनुपस्थितीत असल्याने चर्चांना उधाण आलं.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 02, 2026, 01:47 PM IST | Updated: Nov 02, 2026, 02:00 PM IST
Image Credit: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली
Join

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली.  प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी अमित शाह यांची भेट घेतली. पण या भेटीवेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार अनुपस्थितीत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना वगळून ही भेट घेण्यात आली का? यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने या भेटीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

अमित शाहांसोबत अर्थ खात्याबाबत चर्चा?

राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील मतभेदांच्या चर्चा निराधार असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.

सुनेत्रा अजित पवार आणि पार्थ पवार यांनी यापूर्वीच अमित शाह यांची भेट घेऊन वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी वेळ देण्याची विनंती केली होती, आजची भेट पूर्वनियोजित आणि औपचारिक होती. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न, संघटनात्मक बाबी आणि मतदारसंघांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली, असे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना बाजूला ठेवून ही भेट झाल्याच्या बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे चित्र निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा महत्त्वाचा घटक असून, सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकजुटीने काम करत आहे, असे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

NCPच्या माजी मंत्र्याची मंत्रिमंडळात एंट्री होणार?

राष्ट्रवादी पक्षाच्या एका माजी मंत्र्यांच लवकरच मंत्रिमंडळात एंट्री होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या भेटीत आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात राष्ट्रवादीच्या संबंधित नेत्याला सुनेत्रा पवारांकडे असलेल्या अतिरिक्त खात्याची जबाबदारी देण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांना देखील विनंती केल्याचं समजत आहे. तसेच राष्ट्रवादीला अर्थ खाते लवकरात लवकर देण्यात यावं अशी देखील भूमिका पुन्हा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मांडली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES