SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा निर्णायक वळणावर पोहोचली असताना मोठा ट्विस्ट! विलिनीकरणावरून राष्ट्रवादीत दोन गट

विलिनीकरणावरून राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलिनीकरणाबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची मात्र वेगळी भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 14, 2026, 11:39 PM IST | Updated: Nov 14, 2026, 11:40 PM IST
Join

राष्ट्रवादी विलिनीकरण: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. मात्र या विलिनीकरणावरून राष्ट्रवादीतच 2 मतप्रवाह निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्येष्ठ नेते विलिनीकरणासाठी सकारात्मक असताना सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची भूमिका वेगळी असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. तर या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनीही टीकेची झोड उठवली.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा आता पक्षांतर्गत संघर्षाचं कारण ठरतोय.  विलिनीकरणाच्या चर्चेने राजकीय वातावरण तापल आहे. याच चर्चेवरून राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचं चित्र आहे.

विलिनीकरणावर राष्ट्रवादीत 2 गट? 

सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलांची भेट झाली. भेटीत विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली.  सुप्रिया सुळेंसोबत चर्चा केल्यानंतर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात दिल्लीत चर्चा झाल्याचे समजते.

मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांसोबत बैठक घेतली.  शरद पवारांकडून फोन येतात का? सुनेत्रा पवारांकडून विचारणा करण्यात आल्याचे समजते.   राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलिनीकरणासाठी सकारात्मक आहेत.  सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची वेगळी भूमिका असल्याची चर्चा आहे. 
 

काही दिवसांपासून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल राष्ट्रवादीत नाराज असल्याचीही माहिती आहे.  पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर याआधी पटेल-तटकरेंकडून अमित शाहांकडे तक्रार करण्यात आली. 
विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली.

दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली. मात्र या चर्चेचा तपशील समोर आलेला नाही. या भेटीमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलंय. कारण विलिनीकरणावरून राष्ट्रवादीत वेगवेगळे दावे केले जात आहेत.

अजितदादांसोबतच्या बैठकीत विलिनीकरणाची तारीख ठरल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आता या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनीही पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष्य केले. संजय राऊतांनी थेट शरद पवारांच्या पक्षातील काही नेत्यांवर निशाणा साधला. काही लोक सत्तेसाठी हपापले असल्याची टीका त्यांनी केली. तर विजय वडेट्टीवारांनीही सत्तेशिवाय काहींना अन्न गोड लागत नसल्याचा टोला लगावला.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES