'सत्ता संघर्ष...', तटकरेंवरील आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शिवसेना नेत्यांची...'
अजित पवारांच्या विमानाचे अपघात नाही तर घातपात असून यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या हात असल्याचा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांच्या विमान अपघात झाला नव्हता तर त्यामागे घातपात आहे. या घातपात मागे सुनील तटकरेंचा हात होता असा खळबळजनक दावा केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उलटपुलट चर्चा रंगल्या आहेत. सुनील तटकरेंच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेले आरोप हे कदाचित राजकीय सूड भावनतेून केले असावेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेले आरोप हे कदाचित राजकीय सूड भावनतेून केले असावेत, उगीच पुराव्याशिवाय त्यांनी काहीही बोलू नये. यापूर्वी रामदार कदम आणि महेंद्र थोरवे यांनी काही दिवसांपूर्वीही असे आरोप केले होते. मुद्दा असा आहे की, हे सर्व कोकणातील सगळे शिवसेनेचे नेते आहेत. कोकण परिसरामध्ये तटकरे साहेब हे जवळपास आज ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून सार्वजनिक जीवनामध्ये आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात.
ते पुढे म्हणाले की, त्या परिसरामध्ये सातत्याने या शिवसेनेच्या लोकांच्या किंवा शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधातच त्या ठिकाणी आमची पार्टी वाढवण्याचं काम तटकरे साहेबांनी त्या भागामध्ये केलं. आता त्या ठिकाणी साहजिक आहे की जरी आम्ही एकत्रित आता महाविकास आघाडीच्या वेळेलाही त्या ठिकाणी एकत्र होतो. म्हणजे शिवसेनेबरोबर आणि आता महायुतीच्या पण आम्ही एकत्रित आहोत. त्या ठिकाणी कोकण भागातील सगळे असल्यामुळे स्थानिक पातळीवर सत्ता संघर्ष हा राहतो आणि त्या पार्श्वभूमीतून आपल्या या आरोपाकडे बघावे लागेल. तरीसुद्धा प्रदेश अध्यक्ष तटकरे हे संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या आरोपांना उत्तर देणार आहेत. त्यामुळे ते लोकांना योग्य ते उत्तर देतील. तर वेळ आल्यावर सांगू असंही ते म्हणालेत.