SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भविष्य शोधण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार पक्षातून बाहेर पडतील; ठाकरेंच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

भविष्य शोधण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार पक्षातून बाहेर पडतील. राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत ठाकरेंच्या बड्या नेत्याने खळबळजनक दावा केला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 11, 2026, 20:54 IST | Updated: Nov 11, 2026, 21:19 IST
Join

अंबादास दानवे : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. तर, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. अशातच संजय राऊतांनी राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याचं भाकीत केले आहे. तर, भविष्य शोधण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार पक्षातून बाहेर पडतील असा  खळबळजनक दावा ठाकरेंच्या बड्या नेत्याने केला आहे. 

राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत ठाकरे गटाचे नेते  अंबादास दानवे यांनीही मोठा दावा केला आहे.. भविष्य शोधण्यासाठी आमदार पक्षातून बाहेर पडणार असा दावा त्यांनी केला आहे.  विलिनीकरणाचा काही निर्णय घ्यायचा असेल किंवा त्या संदर्भात चर्चा करायची असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हाला विश्वासात घेईल असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी चार दिवसांपूर्वी केलं होतं. राष्ट्रवादी हा   एनडीएमधील सहकारी पक्ष असल्याचंही फडणवीस यांनी म्हटल आहे. 

20 ते 22 आमदार राष्ट्रवादीमधून बाहेर पडणार; संजय राऊत यांचा मोठा दावा

राष्ट्रवादीतून आमदार फुटणार असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 20 ते 22 आमदार राष्ट्रवादीमधून बाहेर पडणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे... दरम्यान राऊतांच्या या दाव्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना टोला लगावला आहे.

सुनेत्रा पवार यांचे सूचक विधान

सिल्वर ओकवर अनेक नेते शरद पवारांच्या भेटीसाठी येत आहेत.  विलिनीकरणाच्या याच सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. जशी वेळ येईल तशा गोष़्टी कळतील असं सूचक विधान सुनेत्रा पवारांनी केले.  सुनेत्रा पवारांच्या एका वाक्यातील उत्तरानं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना बळ मिळाल्याचं बोललं जात आहे. 

विलीनीकरणाची चर्चा राज्यात, बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र

राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बीडमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याचं चित्र पाहायला मिळालं. शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी एकत्र येत गाळपेरा कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या चर्चांना बीडमधून आणखी हवा मिळाली. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाचे आयोजक शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मात्र दुष्काळाच्या परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची भूमिका मांडली.

आमदार विजयसिंह पंडित यांनीही राजकारण नसल्याचं स्पष्ट केलं. तर खासदार बजरंग सोनवणे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर सूचक विधान करत, दोन वर्षांपासून चर्चा सुरू असल्याचं सांगितले. मात्र या कार्यक्रमाला आमदार संदीप क्षीरसागर यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे दुष्काळाच्या निमित्ताने एकत्र आलेले दोन्ही राष्ट्रवादीचे नेते राजकीय चर्चांना पूर्णविराम देणार की नव्या चर्चांना सुरुवात करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES