• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /एकाच ट्रीपमध्ये समुद्र, किल्ले अन् जंगल सफारी, राज्य सरकारचं नवं पर्यटन धोरण; तुम्हाला काय आणि कसा फायदा होणार जाणून घ्या

एकाच ट्रीपमध्ये समुद्र, किल्ले अन् जंगल सफारी, राज्य सरकारचं नवं पर्यटन धोरण; तुम्हाला काय आणि कसा फायदा होणार जाणून घ्या

सामान्यपणे भटकंती म्हटलं की एकाच पर्यटनस्थळी जाऊन पुन्हा घरी यायचं आणि मग दुसऱ्या ठिकाणी पुढल्या वेळी प्लॅन करायचा. पण आता नव्या धोरणामुळे एकाच ट्रीपमध्ये अनेक पर्यंटनस्थळं पाहता येणार आहेत. ती कशी हे जाणून घेऊयात...

Reported BySwapnil Ghangale
Published: Sep 29, 2026, 01:07 PM IST|Updated: Sep 29, 2026, 02:05 PM IST
joinshare
एकाच ट्रीपमध्ये समुद्र, किल्ले अन् जंगल सफारी, राज्य सरकारचं नवं पर्यटन धोरण; तुम्हाला काय आणि कसा फायदा होणार जाणून घ्या
Image Credit: नवीन प्रयोगामुळे पर्यटकांना होणार फायदा (फोटो एआयवरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

राज्य सरकारने पर्यटनस्थळांना एकमेकांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. एखादे पर्यटनस्थळ पाहून परतण्याऐवजी एकाच सफरीत आसपासची अनेक ठिकाणे पाहता यावीत, यासाठी हे नवीन धोरण लागू केलं जाणार आहे. 'विकसित महाराष्ट्र 2047' अंतर्गत 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2030 या चार वर्षांत राज्यात 100 पर्यटन सर्किट विकसित करण्याचा आराखडा पर्यटन विभागाने जाहीर केला आहे. नेमका याचा काय आणि कसा फायदा होणार आहे जाणून घेऊयात सविस्तरपणे...

एकत्र जोडली जाणार ठिकाणं

या सर्किटमध्ये समुद्रकिनारे, किल्ले, धार्मिक स्थळे, वन्यजीव, जलपर्यटन आणि शहरातील ऐतिहासिक ठिकाणे एकत्र जोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना एका ठिकाणाहून दुसन्या ठिकाणी सहज जाता येईल आणि त्यांचा मुक्कामही वाढेल. दरम्यान, अजिंठा-वेरूळ, लोणार, महाबळेश्वर-पाचगणी, रायगडचे किल्ले, नाशिकची धार्मिक व द्राक्ष पर्यटनस्थळे, शिर्डी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग-मालवण, ताडोबा आणि मेळघाट यांनाही अशा सर्किटमधून जोडले जाणार आहे. रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गाने जोडणीसोबत आरोग्य, पोलिस मदत, इंटरनेट आणि पर्यटकांसाठी माहिती व्यवस्था उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.

रात्रींचा मुक्काम वाढविण्यासाठी होमस्टे, रिसॉर्टची सुविधा

पर्यटकांना एक ते पाच रात्रींचा मुक्काम करता यावा यासाठी हॉटेल निवासस्थाने, भोजन आणि मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जाणार आहे.

3 पर्यटनस्थळे बंधनकारक

नव्या निकषांनुसार प्रत्येक पर्यटन सर्किटमध्ये किमान तीन प्रमुख पर्यटनस्थळे, एन्ट्री पॉइंट, असेम्बली पॉइंट आणि किमान एक प्रमुख वाहतूक केंद्र असणे आवश्यक आहे. सर्किट एका जिल्ह्यात किंवा अनेक जिल्ह्यांत विस्तारू शकते, पर्यटनस्थळांमधील अंतर पर्यटकांच्या प्रवासासाठी व्यावहारिक असणे अपेक्षित आहे.

नवी मुंबई-उरणला संधी

डीपीएस फ्लेमिंगो लेक, वाशी खाडी, बेलापूर किल्ला, नेरुळ-सीवुड्सचा किनारा, उरणमधील करंजा, पीरवाडी, मोरा जेट्टी, शेवा आणि जेएनपीए परिसर जल व निसर्ग पर्यटनासाठी जोडता येऊ शकतात. पुढे घारापुरी लेणी, मुंबई बंदर आणि दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक ठिकाणे जोडल्यास मुंबई-नवी मुंबई-उरण-धारापुरी असा आकर्षक पर्यटन मार्ग तयार होऊ शकतो. ठाणे खाडी, येऊर, उपवन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानही या साखळीत जोडता येणार आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

नवी मुंबईत काय पाहणार?

फ्लेमिंगो लेक, वाशी खाडी, बेलापूर किल्ला, नेरुळ-सौवुड्स किनारा, करंजा, पीरवाडी, मोरा जेट्टी, शेवा, जेएनपीए

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Tourism
Maharashtra News
Mumbai
Mumbai News