SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अटल बिहारी वाजपेयींच्या पुतळ्यासाठी जागा नाही! भाजपाची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचं उत्तर

भाजपच्या तत्कालीन नगरसेविका दक्षा पटेल यांनी 25 सप्टेंबर 2018 रोजी यासंदर्भातील ठरावाची सूचना मांडली होती. तेव्हापासून आजपर्यंत यासंदर्भात नेमकं काय काय घडलंय जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 17, 2026, 10:10 IST | Updated: Nov 17, 2026, 10:51 IST
Image Credit: महापालिकेच्या मुख्यालयात पुतळ्यासाठी जागा नाही (प्रातिनिधिक फोटो)
Join

मुंबई महानगर पालिकेच्या मुख्य सभागृहात अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला जागा नसल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य सभागृहाऐवजी स्थायी समिती अथवा दुसऱ्या सभागृहात पुतळा लावावा असा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे. देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात बसविण्याच्या मागणीला प्रशासनाने जागेच्या अभावाचे कारण देत नकार दर्शविला आहे. सभागृहात यापूर्वीच 13 मान्यवरांचे पुतळे आणि काही महापुरुषांची तैलचित्रे असल्याने, नव्याने पुतळा किंवा तैलचित्र बसविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वाजपेयी यांचा पुतळा मुख्य सभागृहाऐवजी स्थायी समिती सभागृह किंवा अन्य समिती सभागृहात बसविण्याचा पर्याय प्रशासनाने सुचविला आहे. भाजपच्या तत्कालीन नगरसेविका दक्षा पटेल यांनी 25 सप्टेंबर 2018 रोजी यासंदर्भातील ठरावाची सूचना मांडली होती. नगरसेविका दीपाली गोसावी यांनी या सूचनेला अनुमोदन दिले होते. त्यानंतर 9 ऑक्टोबर 2018 रोजी महापालिका सभेत ठराव क्रमांक 874 अन्वये हा प्रस्ताव आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला होता.

 स्मृती जपण्यासाठी पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी

अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषविले. उत्कृष्ट संसदपटू, प्रभावी वक्ते, कवी आणि साहित्यिक म्हणूनही त्यांची ओळख होती. देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. अशा नेत्याची स्मृती जपण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विशाल सभागृहात त्यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या मागणीबाबत सभागृहातील जागेची उपलब्धता आणि वारसावास्तूचे महत्त्व लक्षात घेण्याची भूमिका घेतली आहे.

कशी आहे मुख्य इमारत?

मुंबई महापालिकेची मुख्य इमारत ही श्रेणी दोनमधील वारसावास्तू असून, व्हिक्टोरियन वास्तुशैलीतील सभागृहाला ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व आहे. सध्या या सभागृहात 247 जणांची बैठक व्यवस्था आहे. त्यामध्ये 232 जागा नगरसेवकांसाठी, तर 15 जागा अधिकारी आणि पत्रकारांसाठी राखीव आहेत. नगरसेवकांची संख्या वाढल्याने अधिकारी आणि पत्रकारांच्या बैठक व्यवस्थेवरही ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत नव्याने पुतळा किंवा तैलचित्रासाठी जागा देणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रशासनाचा अभिप्राय या आठवड्यात सभागृहात सादर होणार आहे. 

13 मान्यवरांचे सभागृहात पुतळे मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक

सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि लोकमान्य टिळक यांच्यासह एकूण 13 मान्यवरांचे पुतळे आहेत. याशिवाय काही महापुरुषांची तैलचित्रेही सभागृहात लावण्यात आली आहेत. त्यामुळे नव्या पुतळ्यासाठी नसल्याचे प्रशासनाने आपल्या अभिप्रायात नमूद केले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES