रामदास कदम यांनी दावा केला की, अजित पवारांच्या अपघातामागे सुनील तटकरे यांच्या हात आहे. यानंतर राजकीय वर्तुळासोबत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली आहे. अशातच मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर एक पोस्टर लावण्यात आलं आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर लावण्यात आलेल्या पोस्टवर लिहिलंय की, अजितदादांच्या अपघात आणि घातपात मागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण? त्यासोबत पोस्टरवर मफलरसुद्धा दाखवण्यात आला आहे. तर या नावाचा गौप्यस्फोट 16 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रोहित पवार पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. पोस्टरवर न दिसणारा मफलर मॅन कोण? याचा खुलासा सोमवारी 16 तारखेच्या पत्रकार परिषदेत करण्यात येणार आहे, असं संकेत या पोस्टवरून मिळत आहे. 16 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता कोणता राजकीय बॉम्ब फुटणार? असाही उल्लेख या पोस्टरवर करण्यात आलाय.