उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील मानपाड्यामधील पदाधिकारी प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येच्या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच वकील गुणरत्न सदावर्तेंनी कठोर शब्दांमध्ये या साऱ्या गोंधळवर टीका केली आहे. "हे राजकारण निंदनीय आहे. तुम्ही गोळीच्या गोष्टी करता आम्ही त्याला उत्तर पेनाने देऊ. एखाद्या व्यक्तीला किती सपोर्ट करावा? प्रताप सरनाईक एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देता येत नाही. जे साधं बोनस देऊ शकत नाही त्याला वर तोंड करून म्हणतात ते आम्ही करावाई सहन करणार नाही. सरनाईक आणि शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा वापर केला. पूर्णेकरांच्या खूनात प्रश्न विचारायचा नाही. दडलेल्या राजकारणात मोजलं जात नाही. सहभाग समोर येताच त्यांची पुढची कडी कोणाची आहे हे समोर येईल. आज आपल्या समक्ष येण्यामागचं कारण राजकारणी म्हणून समाज हितासाठी काम करणारा माणूस म्हणून अत्यंत गंभीर मुद्दा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील लोक संकुचित राजकारण करत चालले आहेत," अशी टीका गुणरत्न सदावर्तेंनी केली.
प्रति रॅली कधीच काढली नव्हती
"राजकारणामध्ये माणसात फूट पडेल अशा प्रकारचं वर्तन राजकारण्यांकडून अपेक्षित नाही. शिंदे टोळीची ही माजलेली भाषा कोणी सहन करणार नाही. शिंदे साहेब या संस्कृतीमध्ये एखादी व्यक्ती जाते तेव्हा नाटकी पद्धतीने रडणं येत असतं," असा टोला सरावर्तेंनी लगावला. "पूर्णेकरांसंदर्भात जी काही माणसं रस्त्यावर येतात ती आपल्या भावना आपल्या नातेवाईकांना न्याय मिळावा अशी असते. अशा गोष्टींविरोधात सत्ताधाऱ्यांनी प्रति रॅली कधीच काढली नव्हती. काय चाललं आहे?" असा सवाल सदावर्तेंनी शिंदेंच्या शिवसेनेला केला आहे.
तो मी नव्हेच हे तुमचं चालणार नाही
"तुम्ही भेट देऊ शकतं नाही? भेटायला आले तर भेटत नाहीत. एकनाथ शिंदे हे पालकमंत्री नाहीत, हे पूर्णेकरांच्या पत्नीने जे वक्तव्य केलं ते बरोबर आहे. शिंदे तुम्ही पत्रकारांशी बोलताना काय बोललात? महाराष्ट्रावर प्रश्न विचारणार. दुःखाची भावना टर उडवण्याचा प्रयत्न केला तर त्यावर बोलणार. मीनाक्षी शिंदेंनी असं काल प्रतिक्रिया देताना बोललात. पोलिसांना सांगत आहात का माजी महापौर या तुमच्या भगिनी आहेत. तुम्ही प्रभाव पाडत आहात का? संकुचित राजकारणाचा पायंडा पाडला आहे. ज्याप्रमाणे शोकसभेच्या माध्यमातून लोक रॅली काढत असतील तर त्याला पॉलिटिकल ड्युटी समजू नका. तुम्ही पालकमंत्री आहात का? तुम्ही विचारलं का लोकांना का कॉम्बिंग करत आहेत? राम पूर्णेकर यांना रिक्षात डांबण्यात आलं हे चुकीचं आहे. गेंड्याची कातडी आहे त्यांची! तुमचा काळ संपल्यावर देखील तुम्ही राजीनामा देणार नाही. दोन युवकांना डिटेन केलं. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार दिसत आहेत. एकनाथ शिंदे तुम्ही बहीण म्हणून सांगत आहात असा अर्थ काढला जाईल. मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला का तर पक्षाची बदनामी. तुम्ही राजीनामा घेतला नाही हे सांगत आहात. तो मी नव्हेच हे तुमचं चालणार नाही," असं सदावर्ते म्हणाले.
दाढीवाला अजगर ही कडी जेव्हा...
"एकनाथ शिंदे तुम्हाला कोणी ना कोणी सांगणार पाहिजे. आमच्या हातात कायद्याने दिलेल्या पेनमध्ये जोर आहे. तुम्हारे गोळी का जबाब हम पेन से देंगे. प्रताप सरनाईकला काय बाबा! एसटी महामंडळाकडून बोनस देणं जमेना. अंडा भुर्जीवाल्यांना यांना दिवाळीच महत्व समजायला नको का? अशी लोक साधा बोनस देऊ शकत नाहीत. तो बोलतो शिवसैनिक म्हणून आम्ही ते बिलकुल सहन करणार नाही. एकनाथ शिंदे आणि सरनाईकांना एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देणं होत नाही. पूर्णेकर केसमध्ये दडलेल्या राजकारणात कोणी ही असो मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची कडी जोडली जाईल तेव्हा कळेल," असं सदावर्तेंनी म्हटलं आहे. "दाढीवाला अजगर ही कडी जुळेल तेव्हा डायपर लावावं लागेल," असं सूचक विधानही सदावर्तेंनी केलं.