ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाले आहे. या प्रकरणात ठाणे पोलिसांनी आणि SIT ने पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आरोप करण्यात आलेल्या माजी नगरसेवका मीनाक्षी शिंदे यांची चौकशी केली. त्यासोबत मीनाक्षी त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची आठ वेळा चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येच्या एक महिन्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे ठाणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राम पूर्णेकरांसोबत पूर्णेकर समर्थक असलेल्या दोन तरुणांनी कापूरबावडी पोलिसांवर धक्कादायक आरोप केले आहेत.
कापूरबाडी पोलिसांनी या दोन तरुणांना बेदम मारहाण करुन त्यांच्यासोबत अश्लीलपणे मारहाण करण्यात आली आहे. या तरुणांनी पोलिसांकडे तक्रार केली असता ठाणे सिव्हिल हॉस्पिटमध्ये त्यांचे मेडिकल चेकअप करण्यात आले. त्यातील एक तरुणाचा मेडिकल अहवाल समोर आला आहे.
पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत गंभीर बाबी समोर आली आहे. या अहवालानुसार गळ्याच्या उजव्या बाजूला दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पीडितेने कापूरबावडी पोलीस ठाण्यात पोलिसांकडून पट्टा आणि दांडक्याने शारीरिक मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. या अहवालानुसार या पीडित तरुणाच्या गुप्तांगाच्या भागात तीन जखमा आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपासणीसाठी X-Ray काढण्यात आला आहे.

तर आवश्यक वैद्यकीय उपचारांतर्गत TT Injection देण्यात आले आहे. गुप्तांगाच्या भागातून फॉरेन्सिक तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला असून तो सीलबंद करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. हा नमुना कापूरबावडी पोलिसांमार्फत फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) कडे पाठवण्यात येणार आहे.
आता पोलिसांच्या आरोपानंतर एफएसएल अहवाल हा महत्त्वाचा ठरणार आहे. तर पोलीस या प्रकरणात पुढील तपासात काय होतं, पोलीस आपली भूमिका कधी मांडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महत्त्वाचे या पीडित तरुणांना पोलिसांच्या मारहाणीतच गंभीर दुखापत झाली आहे की, यामागे अजून काही दडलंय हे पाहावं लागणार आहे.