SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

राम पूर्णेकरांने दाखवलेल्या बंदूकवाला त्या व्हिडीओवर राजेंद्र शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, पोलिसांच्या चौकशीनंतर...

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात त्यांच्या मुलगा राम पूर्णेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राजेंद्र शिंदेंबद्दलचा व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओवर राजेंद्र शिंदेंने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 21, 2026, 08:52 PM IST | Updated: Oct 21, 2026, 08:57 PM IST
Image Credit: Rajendra Shinde
Join

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या झाल्यावर त्यांच्या मुलगा राम पूर्णेकर यांनी कायम माजी नगरसेवक मीनाक्षी शिंदे आणि तिचे पती राजेंद्र शिंदे यांना या हत्येमागील सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे. वडिलांच्या हत्येबद्दल राम पूर्णेकर यांनी एक फोटो आणि व्हिडीओ सर्वांसमोर दाखवून या प्रकरणात नवीन ट्विस्ट निर्माण केला आहे. राजेंद्र शिंदे यांनी आरोपी निखील यादवला बंदूक चालवायला शिकवली आहे, असा गंभीर आरोप राम पूर्णेकर यांनी केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ आणि फोटोही दाखवला आहे.

दरम्यान राम पूर्णेकर यांच्या आरोपानंतर राजेंद्र शिंदे यांनी त्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यावर राजेंद्र शिंदे म्हणाले की, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात माझी चौकशी सुरू आहे. माझ्यावरील आरोपांना मी योग्य वेळी उत्तर देईल. तर राम पूर्णेकर यांनी दाखवलेला व्हिडीओबद्दल मला काही माहिती नाही. तो व्हिडीओ मी पहिले बघतो त्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईल, असं ते म्हणालेत.

हेसुद्धा वाचा  - प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मुलगा राम यांचा मोठा खुलासा, बंदूकवाला 'तो' व्हिडीओ दाखवत, राजा शिंदेंवर...

पोलिसांनी राजेंद्र शिंदे यांची पहिल्या दिवशी आठ तास त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी नऊ तास चौकशी झाली. आजही बुधवारी पाचव्यांदा पोलिसांनी राजेंद्र शिंदेंची सात तास चौकशी घेतली आहे. पोलिसांनी पहिल्या दोन चौकशीमध्ये आरोपीच्या समोर बसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्या पकडलेल्या मारेकऱ्यांना मी ओळखतो असं राजेंद्र शिंदेंनी पोलिसांना सांगितलं. पण माझी पत्नी माजी नगरसेविका आहे. त्यांना भेटण्यासाठी अनेक मंडळी येतात, तशीच ही आली होती. तेव्हा मी त्यांना पाहिलं होतं, असं पोलिसांना राजेंद्र शिंदेंनी सांगितलं. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष टल्ली, अमित पपलू आणि राजेंद्र शिंदेंची एकमेकांच्या समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली आहे. राम पूर्णेकर यांनी दाखवलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे राजेंद्र शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाल्याच बोलं जातंय. आता पोलीस या व्हिडीओवर काय कारवाई करतात ते पाहावं लागणार आहे. 


 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES