SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची स्क्रिप्ट कोणी लिहिली? प्रसाद लाड यांनी सांगितलं नाव, म्हणाले 'उदय सामंत यांचा कॉल...'

मनोज जरांगे पाटलांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची स्क्रिप कोणी लिहिली आहे, याबद्दल भाजपच्या प्रसाद लाड यांनी सांगितलं आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 24, 2026, 01:14 PM IST | Updated: Oct 24, 2026, 01:20 PM IST
Image Credit: Prasad Lad
Join

मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचा बॉम्ब फोडल्यापासून महाराष्ट्रातील नेतेमंडळ एकमेकांनावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या प्रकरणात  खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवाय प्रसाद लाड यांनी ती क्लिप फोडली असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यानंतर प्रसाद लाड यांनी त्या ऑडिओ क्लिपचा स्क्रिप राइटर कोण आहे याबद्दल सांगितलं आहे.

500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची स्क्रिप्ट कोणी लिहिली?

पत्रकार परिषद घेत प्रसाद लाड यांनी संजय राऊतांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझी उद्धव ठाकरे यांना विनंती आहे, की सपनों का सौदागरला कुठेतरी आवरलं पाहिजे. आम्हाला जी माहिती मिळाली आहे याआधारावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सांगितले आहे की, ती ऑडिओ क्लिप कुठे बनवली, कशी बनली, ही क्लिप बनवण्यामागे कोणाचा हात आहे. आता मी स्पष्टच सांगतो ही ऑडिओ क्लिपची  स्क्रिप्ट, रॉयटर, दिग्दर्शक संजय राऊत आहेत. संजय राऊतांनी सामनाच्या ऑफिसमध्ये ही स्क्रिप लिहिली आहे. 100 कोटींचा आरोप होता, तो त्यांनी 500 कोटींचा केला. कारण  100 कोटींचा आरोप आला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की, फार काही मीडिया हा विषय उचलणार नाही. त्यामुळे 500 कोटी करण्याची लाइन त्यांनी धरली. या संपूर्ण क्लिपचा क्रिएटर संजय राऊत आहेत, हा आमचा स्पष्ट आरोप आहे.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनाही विनंती करणार आहोत की, क्लिपची चौकशी करताना जी SIT नेमली जाईल. त्यामध्ये संजय राऊतांचीही चौकशी झाली पाहिजे. संजय राऊत कशाप्रकारे स्वप्न विकतोय ही चौकशी राज्याच्या  SIT ने कराला पाहिजे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES