• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'देवेंद्र फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेला कोण कोण ताकद...'; प्रवीण दरेकरांकडून रामदास कदमांवर पलटवार

'देवेंद्र फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेला कोण कोण ताकद...'; प्रवीण दरेकरांकडून रामदास कदमांवर पलटवार

मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपवरुन महाराष्ट्रातील नेते एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत आहेत. रामदास कदम यांनी भाजपवर लक्ष्य केल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 23, 2026, 05:44 PM IST|Updated: Oct 23, 2026, 05:49 PM IST
joinshare
'देवेंद्र फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेला कोण कोण ताकद...'; प्रवीण दरेकरांकडून रामदास कदमांवर पलटवार
Image Credit: Pravin Darekar on Ramdas Kadam

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिप बॉम्बमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं असून सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर पलटवार करत आहेत. जरांगेंच्या आरोपांना उत्तर देताना शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपवर लक्ष्य केलं. प्रसाद लाड यांच्या फोटो दाखवत त्यांनी गंभीर आरोप केला. शिवाय त्यांनी प्रवीण दरेकरांचंही नाव घेतल. त्यानंतर भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी कदमांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

प्रवीण दरेकर काय म्हणालेत?

पत्रकार परिषद घेत प्रवीण दरेकरांनी रामदास कदमांना इशारा दिला. ते म्हणाले की, तुम्हाला जसा तुमच्या नेत्याचा आदर सन्मान आहे, आम्हाला आमच्या नेत्याचा आणि पक्षाचा आदर - सन्मान आहे.  आमची नावं आली आम्ही काय घाबरून काही केलं आहे. त्यावेळला मराठा समाजाच्या मागण्यासाठी मनोज जरांगे आंदोलन करत होते. आमचं तेव्हा समर्थन होतं, आजही आहे आणि उद्याही राहिल. पण ज्यावेळला  देवेंद्र फडणवीस साहेबांना व्यक्तिगत टीका व्हायला लागल्यात, तेव्हा आम्ही प्रतिक्रिया दिली. मग आम्ही असं म्हणायचं का पदरामागे राहून जरांगेला ताकद देणारे कोण होत, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेतून उचलला आहे.

भारतीय जनता पार्टीला दोष देणार असाल तर...

ते पुढे म्हणाले की, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अंगावर सोडायला, देवेंद्र साहेबांना बदनाम करायला तेव्हा कोण कोण होतं, कोणी कोणी काय काय केलं आहे, हे सुद्धा पुढे येईल. पण मला वाटतं एखाद्या जबाबदार ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारचं आपल्या नेतृत्त्वाला खूष करण्यासाठी, आपल्या मुलाचं मंत्रीपद सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा आणखी प्रमोशन मिळण्यासाठी त्यांनी त्याठिकाणी बोलावं आमचं त्यासाठी काही हरकत नाही. पण भारतीय जनता पार्टीला दोष देणार असाल तर खपवून घेणार नाही. तुम्ही जसे कडक आक्रमक बोलता आम्हाला वागता येतं आम्हालाही बोलता येतं. रामदास कदम यांनी सांगावं की भाजपच्या कुठल्या नेत्याने विडा उचलला आहे ते.

त्यांच्याविरोधात कटकारस्थान झाले...

ते पुढे म्हणाले की,  तुम्ही सांगता मराठा समाजाच्या नेत्याला संपवण्याचा कट भाजपच्या नेत्याला हाताशी घेऊन करत आहात. आम्ही म्हणायचं का देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी जरांगेला कोण कोण ताकद देत होतं. त्यामुळे मला वाटतं आपण एका घरात राहतो, एका घरात नांदतो तर आपण सभ्यता संस्कृतपणा राखला पाहिजे. फडणवीस यांच्यावर आरोप झालेत, त्यांच्याविरोधात कटकारस्थान झाले, त्याचं स्वागत आहे का? आता त्याठिकाणी आपल्या नेत्यावर टीका झाल्यावर बोलणं स्वाभाविक आहे. तुम्ही बोला पण मी सांगतो की चौकशी झाली पाहिजे. जे असतील त्यांच्यावर कारवाई करा. पण भाजप जबाबदार आहे, भाजप षडयंत्र करतो, हे बोलणं बंद करा. त्या टीकांचीही आम्ही चौकशीची मागणी करु. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pravin Darekar
Maharashtra Politics
Devendra Fadnavis