• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /दादर रेल्वे स्टेशनजवळच्या लॉजमध्ये राहिल्या होत्या राधा आणि बबिता; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट

दादर रेल्वे स्टेशनजवळच्या लॉजमध्ये राहिल्या होत्या राधा आणि बबिता; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील महिला आरोपी राधा आणि बबिता यादादर रेल्वे स्टेशनजवळच्या लॉजमध्ये राहिल्या होत्या.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 26, 2026, 05:13 PM IST|Updated: Oct 26, 2026, 05:20 PM IST
joinshare
दादर रेल्वे स्टेशनजवळच्या लॉजमध्ये राहिल्या होत्या राधा आणि बबिता; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील गोळीबार प्रकरणात राधा आणि बबिता या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.  राधा आणि बबिता यांनीच आरोपींना शस्त्र पुरवली होती. राधा आणि बबिता या दादर रेल्वे स्टेशनजवळील एका लॉजमध्ये राहिल्या होत्या. यांनी आरोपींपर्यंत शस्त्र कशी पोहचवली याची माहिती देखील तपासादरम्यान समोर आली आहे. 

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपी राधा आणि बबिता यांनी दादरमध्ये शूटर्सना शस्त्र दिले होते अशी माहिती समोर आली. या दोघी दादर रेल्वे स्टेशनजवळील रॉयल लॉजमध्ये वास्तव्यास होत्या अशी माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. अभिनेता टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात  11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

फायरिंगनंतर आरोपीना पिस्तूल आणि उरलेली काडतूसं परत घेऊन जाण्याचे निर्देश

तपासादरम्यान टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. फायरिंगनंतर आरोपींना पिस्तूल आणि उरलेली काडतूसं परत घेऊन येण्याचे निर्देश देण्यात आले  होते.   आरोपी पकडले गेले नसते तर वापरलेली पिस्तूल आणि काडतूसं पुन्हा दिल्लीला घेऊन येण्याचे निर्देश होते.  कुणाल याला हे निर्देश होते तर ते पुढे शुटर्सना देखील कळवले होते. मात्र, पोलिसांच्या तपासाचा वेग पाहता पिस्तूलं सुरतला फेकून दिल्याची माहिती सोमर आली आहे.  शस्त्र पुन्हा मुळ ठिकाणी पाठवून पुरावा कायमचा नष्ट करण्याचा प्लॅन  होता.

मुंबई क्राईम ब्रांचला सापडले महत्वाचे पुरावे 

तपासादरम्यान मुंबई क्राईम ब्रांचला महत्वाचे पुरावे सापडले आहेत.  आरोपी कुणाल, सुमित, राधा आणि बबिताच्या फोनमध्ये महत्वाचे पुरावे आढळले आहेत.  शस्त्र कुठून घ्यायचं आणि कुठे ठेवायचं याबाबत व्हॉइस नोट्समार्फत  संभाषण केलं होतं.  संबंधित व्हॉइसनोट्स पोलिसांच्या हाती लागली आहे.  व्हॉइस नोट्सची तपासणी करून नेमका आवाज कुणाचा आहे या पोलिस शोध घेणार आहेत. 

तपासात समोर आलेली धक्कादायक माहिती

आरोपी हे पूर्वनियोजित कटाचा भाग आहेत. आरोपी ज्या हॉटेलमध्ये राहत होते, त्या हॉटेलच्या परिसराचा पंचनामा करण्यात आला आहे. तपासादरम्यान शस्त्रे नष्ट करण्यात आली किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यात आली, ते ठिकाण पोलिसांना समजले आहे. राधा हिने आरोपींना शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे. आरोपींनी अनेक छायाचित्रे, व्हिडिओ आणि इतर डेटा डिलीट केला आहे.  आरोपींना या कटाची माहिती होती, हे सिद्ध करणाऱ्या अनेक व्हॉइस नोट्स (ध्वनिसंदेश) जप्त करण्यात आल्या आहेत.

शस्त्रे कोणत्या उद्देशाने दिली जात होती, याची आरोपींना माहिती होती. या कटामध्ये टोळीचा प्रमुख अनिल पंडित याची भूमिका काय होती, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. पुढील तपासासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक आहे. विशेषतः शस्त्रे कोणत्या बॅगेत लपवण्यात आली होती आणि ती कुठे लपवण्यात आली होती, हे शोधणे आवश्यक आहे. ही उपकरणे कोणत्या टोळीची होती आणि तांत्रिक मदत कोणी पुरवली, हे निश्चित करणे आवश्यक आहे. आरोपींना स्थानिक पातळीवर मदत कोणी केली, हेही शोधणे गरजेचे आहे. कारण गोळीबार करणारे आणि इतर आरोपी हरियाणातील आहेत.

आरोपींच्या वकिलांच्या युक्तीवाद

तपास यंत्रणेने आरोपींचे मोबाईल फोन, सिमकार्ड आणि वाहने यापूर्वीच जप्त केली आहेत. आरोपींना आणखी काळ पोलीस कोठडीत ठेवल्याने कोणताही अतिरिक्त पुरावा मिळणार नाही. ट्रान्झिट रिमांडच्या कालावधीसह गेल्या सात दिवसांत तपास यंत्रणेने जवळपास सर्व संबंधित पुरावे गोळा केले आहेत. तपास यंत्रणेने सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे मिळवून त्यांची नोंद केली आहे. दोन पिस्तुले आणि काही जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

सिग्नल ॲपमधील डेटा मिळवण्यात आला आहे. तसेच आवाजाचे नमुने, छायाचित्रे आणि इतर संबंधित साहित्यही गोळा करण्यात आले आहे. आरोपींपैकी कोणाचा अनिल पंडित याच्याशी थेट संबंध होता, हे तपास यंत्रणेला अद्याप सिद्ध करता आलेले नाही.

बचाव पक्षाने सांगितले की, काल सुट्टीकालीन न्यायालयासमोरही असाच युक्तिवाद करण्यात आला होता. त्यावेळी तपास यंत्रणेने अकरावा आरोपी अनिल पंडित याच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. या टप्प्यावर आरोपींना आणखी पोलीस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही.

आंतरराज्यीय तपास करून आणि आरोपींना अटक करूनही, गुन्हे शाखेला आरोपींना कथितरीत्या पुरवण्यात आलेल्या स्थानिक मदतीचा स्रोत शोधता आलेला नाही. यापूर्वीच पुरावे गोळा करण्यात आले असून, आवश्यक पोलीस कोठडीतील चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवावे, अशी मागणी बचाव पक्षाने केली.

क्राइम ब्रँचचा युक्तिवाद 

आरोपींकडून आवाजाचे आणखी नमुने आणि इतर संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे. आवाजाचे नमुने आवश्यक असल्यास न्यायालयाची परवानगी घेऊन न्यायालयीन कोठडीत असतानाही आरोपींकडून ते नमुने गोळा करता येऊ शकतात. त्यामुळे आरोपींना आणखी पोलीस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Tiger Shroff
crime
Mumbai
Entertainment News