• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /...म्हणजे महाराष्ट्रविरोधी धोरण; कर्जत वृक्षतोडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 2 शब्दात पहिली प्रतिक्रिया

...म्हणजे महाराष्ट्रविरोधी धोरण; कर्जत वृक्षतोडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 2 शब्दात पहिली प्रतिक्रिया

भीमाशंकर अभयारण्यात बेसुमार वृक्षतोडसंदर्भात विरोधकांकडून टीका होत असताना मुख्यमंत्र्‍यांनी दोन शब्दात पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 25, 2026, 05:05 PM IST|Updated: Oct 25, 2026, 05:08 PM IST
joinshare
...म्हणजे महाराष्ट्रविरोधी धोरण; कर्जत वृक्षतोडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 2 शब्दात पहिली प्रतिक्रिया
Image Credit: Raigad Karjat

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्यात बेसुमार वृक्षतोडसंदर्भात विरोधक आक्रमक झाले आहेत. या परिसरात टोरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. नवी मुंबईतील महापेत इंडिया ज्वेलरी पार्कच्या भूमिपूजन मुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भीमाशंकर अभयारण्यात बेसुमार वृक्षतोडवरून जो वाद सुरू आहे, त्यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्‍यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कर्जतच्या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री दोन शब्दात म्हणालेत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिली गोष्ट फेक नरेटिव्हशिवाय याला काही म्हणता येणार नाही. आपल्याकडे पंप स्टोरेज म्हणजे हायडल पॉवर ही क्लिन पॉवर म्हणजे स्वच्छ पॉवर आहे. प्रदूषण न करणारी ही उर्जा आहे. आज आपण विचार केला तर जास्त क्षमता आपण सोलारची आपण तयार केली आहे.पण आपला पिक अवर सोलारच्या नंतर असतो म्हणजे पाच वाजेनंतर सोलरची वीज मिळत नाही. आणि मग तो जो पीक अवर चार तासांचा आहे. याकरता जर कोळशाची वीज आपण वापरली तर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. आणि म्हणून पंप स्टोरेजच्या माध्यमातून क्लीन एनर्जी ही वापरण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पंप स्टोरेजचा हब झालेला आहे. त्यातलाच हा एक प्रकल्प आहे. की ज्याच्यामध्ये 3000 मेगावट वीज तयार होणार आहे. ही पूर्णपणे क्लीन एनर्जी आहे आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे. जी जागा घेतलेली आहे ती कशा करता घेतली आहे. त्या ठिकाणी रिझर्वायर तयार होणार आहे. तलाव तयार होणार आहे. पाण्याची साठवणूक होणार आहे. जसं आपण धरण तयार करतो तशी धरणा करता जी जागा आहे. त्याच्या बदल्यामध्ये जवळपास तीन पट जागा कंपनीने वनविभागाला दिलेली आहे. वनविभाग कंपनीच्या खर्चाने त्या ठिकाणी  30 हजार झाडं आणि 60 हजार झाडं या साइटवर अशी 90 हजार झाडं लावणार आहे.  पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ही 3000 मेगावट वीज जी क्लीन पॉवर आपल्याला मिळतेय ही जर मिळाली नाही तर आपण कुठली पॉवर घेऊ कोळशाची म्हणजे थर्मल पॉवर आता म्हणजे 3000 मेगावट थर्मल पॉवर करता त्यातलं जे प्रदूषण तयार होतं. ते प्रदूषण मिटगेट करायचं असेल 28 कोटी झाडं लावावी लागेल. फूल ग्रोन  28 कोटी झाडं जर ते प्रदूषण कमी करायचं असेल.

दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण जर एकूण 3 हजार मेगावॅटमधून थर्मल पॉवर मधून किती प्रदूषण होतं 40 लाख गाड्या जेवढं प्रदूषण करतील तेवढं प्रदूषण यातून होईल. त्यामुळे आपण क्लिन एनर्जीचा प्रकल्प आणतो आहोत. तिसरं गोष्ट म्हणजे जर ही वीज आपण थर्मल घेतली तर किती पाणी लागतं आपल्याला 19 अब्ज घनफूट म्हणजे जवळपास चार लाख लोकांना पुरेल इतकं पाणी हे वीजेसाठी वर्षाला आपल्याला त्या ठिकाणी वापराव लागणार आहे. ते पाणीही या प्रकल्पात वाचणार आहे. एकूण आपण म्हटलं तर इतका पर्यावरणपूरक हा प्रकल्प आहे. भीमाशंकर जंगलापासून प्रकल्प 16 किमी अंतर दूर आहे. आणि भीमाशंकर मंदिरापासून प्रकल्प 20 किमी अंतर दूर आहे. दुसरं सगळी गुंतवणूक महाराष्ट्रातून आहे, रोजगार महाराष्ट्रात आहे आणि ऊर्जेवरही ही पहिला अधिकार महाराष्ट्राचा आहे.

पुढे ते म्हणाले की, पण जाणीवपूर्वक खोटा नरेटिव्ह तयार करायचा जे काम चाललेल आहे हे महाराष्ट्र विरोधी काम आहे. कायद्याच्या चौकटीतून 18 महिने सुनावणीनंतर हा प्रकल्प मंजूर झाला आहे. पण जर ग्रामस्थांचं म्हणणं असेल ते ऐकून घेतलं जाईल आणि त्याच्यावर मार्ग काढण्याच येईल. कारण हा प्रकल्पच समाजासाठी होतोय. त्यामुळे समजाचा कुठलाही वर्ग वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जणार आहे. पण केवळ राजकारणाकरता फेक नरेटिव्ह करुन महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने येणारी क्लीन एनर्जी ही थांबवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते मात्र योग्य नाही. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Devendra Fadnavis
Maharashtra Politics