संपूर्ण ट्रेन रिकामी दरवाजे बंद केले, सर्व सामान्या प्रवाशांना आत चढू दिले नाही, रेल्वे कर्मचाऱ्यांचे संतापजनक कृत्य
रेल्वे कर्मचाऱ्यांचे संतापजनक कृत्य समोर आले आहे. संपूर्ण ट्रेन रिकामी असताना दरवाजे बंद केले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी सर्व सामान्या प्रवाशांना आत चढू दिले नाही.
मध्य रेल्वे : मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोडमडली आहे. सकाळी 10 वाजता विस्कळीत झालेली वाहतूक संध्याकाळी उशीरापर्यंत पूर्ववत झालेली नाही. यामुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अशातच ठाणे रेल्वे स्थानकात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या ट्रेनमध्ये इतर प्रवाशांना चढू दिले नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांचे संतापजनक कृत्य समोर आले आहे.
प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची भयानक गर्दी
दहा तासांपेक्षा अधिक वेळ मध्ये रेल्वेची वाहतूक कोलमडलेली आहे. मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे. अशातच ठाणे रेल्वे स्थानकात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. रेल्वे कर्मकाऱ्यांसाठी राखीव असलेल्या ट्रेनमध्ये इतर प्रवाशांना चढू दिले नाही.
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव ट्रेन
मध्ये रेल्वेवर खास रेल्वे प्रवाशांसाठी एक विशेष लोकल धावते. CSMT ते कल्याण अशी ही लोकल आहे. ही लोकल ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2 वर आली असताना कल्याणकडे जाणाऱ्या या धीम्या लोकलचा डबा रेल्वे कर्मचाऱ्यांनी आतून बंद केल्याने मोठा गोंधळ उडाला.
ठाणे रेल्वे स्थानकात ही लोकल थांबली असताना प्रवाशांनी 2 ते 3 मिनिटे विनवणी करूनही कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला नाही. या मुजोरपणाचा निषेध करत संतापलेल्या एका प्रवाशाने बंद दरवाजावर पाणी फेकून तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेमुळे फलाटावर काही काळ तणावाचे वातावरण होते. प्रवाशांसह आरपीएफचे जवान देखील रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवाजा उघडण्यास सांगत होते. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला नाही.
10 तासांपासून प्रवासी खोळंबले आहेत. ट्रेन रिकामी असताना यांनी आतून दरवाजे लावून घेतले. सर्व सामान्य प्रवाशांना आत चढू दिले नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या मुजोरपणाचा प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.