• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /पर्मनंट सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांना मोठा धक्का! आरोग्य विभागात तब्बल 14,787 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती; आरोग्यमंत्र्याची मोठी घोषणा

पर्मनंट सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांना मोठा धक्का! आरोग्य विभागात तब्बल 14,787 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती; आरोग्यमंत्र्याची मोठी घोषणा

आरोग्य विभागात तब्बल 14,787 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. आरोग्यमंत्र्यानी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पद निर्मीतीला मान्यता दिली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 27, 2026, 04:51 PM IST|Updated: Oct 27, 2026, 05:24 PM IST
joinshare
पर्मनंट सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांना मोठा धक्का! आरोग्य विभागात तब्बल 14,787 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती; आरोग्यमंत्र्याची मोठी घोषणा

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर : सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांना मोठा धक्का देणारा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. आरोग्य विभागात तब्बल 14,787 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे.  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर  यांनी मोठा  निर्णय झाला आहे. कंत्राची पद भरतीच्या अनुषंगाने पदनिर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. 

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीला मंजुरी 

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 14 हजार 787 पात्र कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदनिर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. अधिसंख्य पदांसाठी 983 कोटी 80 लाख रुपयांच्या वार्षिक खर्चास शासनाने मान्यता दिली आहे.

10 वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा

सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे 10 वर्षांहून अधिक काळ आरोग्यसेवा देणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. पात्र कर्मचाऱ्यांचे सध्याचे वेतन संरक्षित राहणार असून मूळ वेतनासह महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता लागू होणार आहे.

वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेविका, औषधनिर्माते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानंतर अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

15010 कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तावित कार्यवाही लागू केली जाईल.  सुधारित प्रस्तावानुसार 14 हजार 787 पात्र कर्मचाऱ्यांना अंतिम मान्यता देण्यात आली आहे. संबंधित अधिसंख्य पदे 25 जून 2026 पासून अस्तित्वात आल्याचे मानण्यात येणार आहे. या निर्णयासाठी 978 कोटी 80 लाख रुपये वेतनासाठी आणि 5 कोटी रुपये प्रवास भत्त्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. अधिसंख्य पदनिर्मिती ही एकवेळची विशेष तरतूद; पदे व्यक्तिसापेक्ष असून कर्मचारी सेवेत असेपर्यंतच अस्तित्वात राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या पदांवर नव्याने नियुक्ती करता येणार नाही. पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना आणि निवृत्तिवेतनासारखे लाभ लागू नसतील. संबंधित कर्मचाऱ्यांची कमाल सेवावयोमर्यादा 85 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांच्या सेवाविषयक प्रश्नावर शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Mumbai News