• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /रुपाली चाकणकर यांचा मोठा निर्णय! केली ट्रेडमार्क नोंदणी, म्हणाल्या 'जर माझे नाव, फोटो, ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा वापर...'

रुपाली चाकणकर यांचा मोठा निर्णय! केली ट्रेडमार्क नोंदणी, म्हणाल्या 'जर माझे नाव, फोटो, ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा वापर...'

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माझ्या पूर्वपरवानगीशिवाय नाव, फोटो,ओळख आणि त्यांच्या विशिष्ट शैलीचा वापर केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 15, 2026, 10:43 AM IST|Updated: Nov 15, 2026, 11:05 AM IST
joinshare
रुपाली चाकणकर यांचा मोठा निर्णय! केली ट्रेडमार्क नोंदणी, म्हणाल्या 'जर माझे नाव, फोटो, ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा वापर...'
Image Credit: रुपाली चाकणकरांचा पूर्वपरवानगीशिवाय नाव, फोटो,ओळख आणि विशिष्ट शैलीचा वापर केल्यास कारवाईचा इशारा

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपलं नाव, फोटो,ओळख आणि त्यांच्या विशिष्ट शैलीची ट्रेडमार्क नोंदणी केली आहे. तसंच आपल्या पूर्वपरवानगीशिवाय यांचा वापर केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. स्वयंघोषित बाबा अशोक खरातवर आधारित 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' चित्रपट आला असतानाच रुपाली चाकणकर यांनी हा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयामागे हाच चित्रपट आहे की नाही याबाबत स्पष्टता नाही.

रुपाली चाकणकरांची पोस्ट -

"माझे नाव, माझा फोटो, माझी ओळख, माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे. माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो, ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ, फिल्म, रील, टीझर, प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी, वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास, अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल," असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

 

माझे नाव,माझा फोटो,माझी ओळख,माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे. माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो,ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो,व्हिडिओ, फिल्म,रील,टीझर,प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी,वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास,अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.असे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल.

— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 15, 2026

 

"असे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल," असंही त्यांनी म्हटलं आहे. 
 

अशोक खरात प्रकरणाची सुरुवात कशी झाली?

अशोक खरात हा स्वतःला कॅप्टन, अंकशास्त्राचा अभ्यासक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून ओळख करून देत होता. नाशिकच्या सिन्नर परिसरातील शिवनिका संस्थानशी त्याचा संबंध होता. रुपाली चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची खरातशी ओळख साधारण 2019 च्या आसपास झाली, असे त्यांनी नोव्हेंबरमधील मुलाखतीत सांगितले.

चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो आणि पाद्यपूजा करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.

मार्च 2026 मध्ये अशोक खरातला अटक करण्यात आली. एका 27 वर्षीय तरुणीने खरातविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. संबंधित तरुणीने दोन वर्षांच्या काळात वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता आणि जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले.

खरातसोबत रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि पाद्यपूजेचा व्हिडीओ चर्चेत आला. चाकणकर या त्यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. महिलांच्या शोषणाविरोधात काम करणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षांचे खरातशी असलेले संबंध काय, असा विरोधकांनी सवाल केला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. 
 


रुपाली चाकणकर यांचे राजीनामे

20 मार्च 2026 रोजी  रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. निष्पक्ष तपास व्हावा यासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. 27 मार्च 2026 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News