SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'सुप्रिया सुळेंचं नाव....', PM मोदींनी शरद पवारांना फोन केल्यानंतर संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले 'पवार आणि त्यांचा पक्ष...'

राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 05, 2026, 11:28 AM IST | Updated: Nov 05, 2026, 11:36 AM IST
Image Credit: नरेंद्र मोदी खोटारडे गृहस्थ, संजय राऊतांची टीका
Join

राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवारांना प्रकृतीच्या कारणास्तव पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर दोन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आता वैद्यकीय चाचण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णलायात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान डिस्चार्ज मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी त्यांनी त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. दरम्यान संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आजारपणातही राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

लालू यादवही मोठे नेते असून आजारी असतानाही नरेंद्र मोदींनी त्यांना फोन केला नाही सांगत संजय राऊतांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी आपल्या सोयीप्रमाणे चौकशी करत असून, ते खोटारडे गृहस्थ आहेत. आजारपणांच्या चौकशीतही राजकारण करतात असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच शरद पवार त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत असं म्हटलं आहे.

हे ही वाचा - 'सुप्रिया आणि आम्ही...', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन

"नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत पण खोटारडे गृहस्थ आहेत. शरद पवार आजारी आहेत म्हणून फोन केला. पण मग लालू यादवही आजारी आहेत. लालू यादवसुद्धा मोठे नेते आहेत. पंतप्रधानांनी देशातील सर्व प्रमुख नेते, ज्यांनी कधी सत्तेत, विरोधी पक्षात महत्त्वाची कामगिरी निभावली आहे त्या सगळ्यांचीच चौकशी केली पाहिजे. पण सोयीची चौकशी करतात," असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, "सुप्रिया सुळेंचे नाव घेऊन संभ्रम निर्माण केला. आजारपणांच्या चौकशीतही राजकारण करतात. मोदींनी कितीही फासे टाकले तरी त्यांना पवार साहेब आणि त्यांचा पक्ष भूलथापांना बली पडणार नाहीत".

नरेंद्र मोदींनी फोनवरुन केली चौकशी

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, अशी माहिती विठ्ठल मणियार यांनी दिली. पंतप्रधानांनी शरद पवार यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, असे त्यांनी सांगितले.

'सुप्रिया आता पूर्णपणे सज्ज आहेत'

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पवार साहेबांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी अत्यंत आपुलकीने व आदराने संवाद साधत, पवार साहेबांना पूर्ण विश्रांती घेण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदींनी त्यांना सांगितले की, सुप्रिया आता पूर्णपणे सज्ज आहेत आणि त्या इतर सहकाऱ्यांसोबत देशाची जबाबदारी सांभाळतील, त्यामुळे पवार साहेबांनी आता विश्रांती घ्यावी," असे मणियार यांनी सांगितले.

पवारांनी मानले मोदींचे आभार

पवार साहेबांनी प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले, असेही त्यांनी सांगितले. "पवार साहेबांनी पंतप्रधानांना सांगितले की, ते विश्रांती घेत आहेत आणि देशाला काहीही काळजी करण्याचे कारण नाही, कारण सर्व गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी सर्वजण इथे आहोत. त्यांनी आपली विचारपूस केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले," असे त्यांच्या सहाय्यकाने सांगितले.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES