महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0
मंत्री उदय सामंतांनी ऑपरेशन टायगरबाबत केलेल्या सूचक विधानावर संजय राऊतांनी उत्तर दिले. आम्ही टायगर आहोत हे त्यांनी मान्य केलं, उड्या मारणारे माकडं नाही असा टोला राऊतांनी लगावला.
महाराष्ट्र राजकारण : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगू लागलीय.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन टायगर 3.0 राबवलं जाणार असल्याची चर्चा आहे.. मंत्री उदय सामंत यांनीही या ऑपरेशनला दुजोरा दिलाय.. मात्र यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झालेत. संजय राऊतांनी थेट माकडाची उडी म्हणत डिवचलंय.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय शिकारीची चर्चा सुरू झाली आहे. या शिकारीचं नाव आहे ऑपरेशन टायगर 3.0. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. मंत्री उदय सामंत यांनी या चर्चेला दुजोरा दिला आहे. मात्र नेमका वार कधी होणार? याबाबत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.
सामंतांच्या विधानानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनेही पलटवार केला. खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेला थेट लक्ष्य केले. आम्ही टायगर आहोत. त्यांच्यासारखे उड्या मारणारे माकड नाहीत.
अशा शब्दांत राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचल आहे. शिंदेंची शिवसेना पुन्हा ऑपरेशन टायगर राबवणार?
दरम्यान शिंदेंच्या पक्षाची अवस्था ना घर का ना घाट का झाली अशी टीका केली. स्वाभिमान गुंडाळून त्यांना काम करावं लागत असल्याची टीकाही खासदार राऊतांनी केली. यावर राऊतांमुळेच त्यांच्या पक्षाची अधोगती झाल्याचा पलटवार शिंदेंचे नेते संजय शिरसाट यांनी केला. अनेक जण एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून पक्षप्रवेशाची इच्छाही व्यक्त करत आहेत. मात्र अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच घेती. असं मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
शिंदेंची शिवसेना पुन्हा ऑपरेशन टायगर राबवणार? अनेकजण आमच्या संपर्कात असल्याचे संजय शिरसाट म्हणाले. एकनाथ शिंदे निर्णय घेतील असही शिरसाट म्हणाले. या राजकीय संघर्षात आदित्य ठाकरे यांनीही सरकारला सुनावले. ऑपरेशन करायचं असेल तर करा... पण महाराष्ट्रात पाणीटंचाई आहे. उद्योगधंदे राज्याबाहेर जात आहेत. अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरेंनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. एकीकडे ऑपरेशन टायगरची गर्जना. दुसरीकडे ठाकरे गटाची आक्रमक डरकाळी. या राजकीय चर्चांनी वातावरण तापल आहे. पण या ऑपरेशनमध्ये नेमकी कुणाची शिकार होणार? याचं उत्तर सध्या गुलदस्त्यात आहे.