मध्य प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2027 या वर्षाचे प्रस्तावित सुट्टीचे कॅलेंडर चर्चेत आले आहे. वर्षभरातील शनिवार-रविवार आणि सार्वजनिक व सामान्य सुट्ट्या मिळून कर्मचाऱ्यांना एकूण 121 दिवसांची सुट्टी मिळू शकते. विशेष म्हणजे मार्च महिन्यात रजा योग्य पद्धतीने घेतल्यास सलग नऊ दिवसांचा ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
प्रस्तावित कॅलेंडरनुसार, मध्य प्रदेशातील सरकारी कार्यालयांमध्ये सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस कामका 52 शनिवार आणि 52 रविवार मिळून 104 साप्ताहिक सुट्ट्या होतात. त्यात 17 सार्वजनिक आणि सामान्य सुट्ट्यांची भर पडल्यास एकूण 121 दिवस सुट्ट्यांचा आकडा गाठला जातो. या गणनेनुसार सरकारी कार्यालये वर्षभरात सुमारे 244दिवस सुरू राहतील.
कर्मचाऱ्यांसाठी 62 ऐच्छिक सुट्ट्यांची यादी प्रस्तावित असल्याचे वृत्त आहे. या यादीतून प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या आवडीनुसार तीन दिवस सुट्ट्या निवडता येऊ शकतात. विविध धर्म आणि समुदायांच्या सणांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरते.
मार्च 2027 मध्ये 20 आणि 21 मार्चला शनिवार-रविवार,22 मार्चला होळी आणि 26 मार्चला गुड फ्रायडे अशी सुट्टीची शक्यता आहे. 24 मार्चला भाईदूज असल्याचे प्रस्तावित वेळापत्रकात नमूद आहे. कर्मचारी 23 आणि 25 मार्चला रजा घेऊ शकले, तर 20 ते 28 मार्चदरम्यान सलग नऊ दिवसांचा ब्रेक मिळू शकतो.
एप्रिलमध्ये गुडीपाडवा आणि चेटीचंदच्या आसपास 7 ते 11 एप्रिलदरम्यान पाच दिवसांचा ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. तसेच 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 15 एप्रिलला रामनवमी आणि 19 एप्रिलला महावीर जयंती अशा तारखांचा समावेश प्रस्तावित यादीत आहे. 16 एप्रिलला रजा घेतल्यास 14 ते 19 एप्रिलदरम्यान सहा दिवसांचा ब्रेक तयार होऊ शकतो.
ऑक्टोबर महिन्यात 27 ते 31 ऑक्टोबरदरम्यान धनत्रयोदशी, छोटी दिवाळी, दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज असे सण सलग येत असल्याचे प्रस्तावित कॅलेंडरमध्ये नमूद आहे. मध्य प्रदेश सरकारची 2027 ची अंतिम सुट्टी यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच या सर्व तारखा आणि सुट्ट्यांची संख्या निश्चित होतील, याची नोंद घ्या.