• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /टीम इंडिया अजूनही WTC Final मध्ये पोहोचू शकते? पाहा कसं आहे समीकरण

टीम इंडिया अजूनही WTC Final मध्ये पोहोचू शकते? पाहा कसं आहे समीकरण

WTC Final Qualification For Team India : कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पाचव्या दिवशी हातात आलेला पहिला टेस्ट सामना गमावला आणि अखेर तो ड्रॉ झाला. यामुळे भारताच्या WTC पॉईंट्स टेबलवरील टक्केवारीवर परिणाम झाला असून यानंतर टीम इंडिया WTC Final मध्ये कशी पोहोचू शकते याविषयी जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Nov 23, 2026, 22:01 IST|Updated: Nov 23, 2026, 22:35 IST
joinshare
टीम इंडिया अजूनही WTC Final मध्ये पोहोचू शकते? पाहा कसं आहे समीकरण
Image Credit: टीम इंडिया अजूनही WTC Final मध्ये पोहोचू शकते? पाहा कसं आहे समीकरण

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
Fact Check:'प्रत्येक नागरिकाच्या खात्यात ३० हजार रुपये' तुम्हाला आला का मेसेज? PIB ने सांगितले सत्य!

Fact Check:'प्रत्येक नागरिकाच्या खात्यात ३० हजार रुपये' तुम्हाला आला का मेसेज? PIB ने सांगितले सत्य!

2

मेहुण्याने लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या दोन्ही भावोजींच्या गळ्यात घातला 100 फूट लांब 1-1 कोटींच्या नोटांचा हार; VIDEO तुफान व्हायरल

3

कोणत्या 3 बँका कोसळल्यास देशाची अर्थव्यवस्था हादरून जाईल? खुद्द RBIनेच दिली अपडेट

4

टीम इंडिया अजूनही WTC Final मध्ये पोहोचू शकते? पाहा कसं आहे समीकरण

5

Holiday List: 2027 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना 4 महिने सुट्ट्या, मार्चमध्ये तर सलग 9 दिवसांचा ब्रेक!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

WTC Final Qualification For Team India : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दोन टेस्ट सामन्यांच्या सीरिजमधील पहिला सामना पार पडला. सोमवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी सामना टाय झाला आणि त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जाण्याचे भारताचे गणित कठीण झाल्याचं बोललं जातं आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पाचव्या दिवशी हातात आलेला सामना गमावला आणि परिणामी तो ड्रॉ झाला. मात्र अजूनही भारताला WTC Final मध्ये पोहोचण्याची संधी आहे.

सध्या चौथ्या स्थानावर भारत :

सामना ड्रॉ झाल्यावर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारत 50 टक्के पॉईंट्सने चौथ्या क्रमांकावर आहे. दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजपूर्वी भारताचे पॉईंट्स 51.52 टक्के इतके होते. सध्याच्या WTC सायकल (2024-27) मध्ये भारताला अजून सहा टेस्ट सामने खेळायचे आहेत. एक सामना क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंडविरुद्ध, आणि पाच सामने जानेवारी फेब्रुवारी 2027 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात खेळायचे आहेत.

भारताला सहा टेस्ट अजून खेळायचेत :

पॉईंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका 75 टक्के पॉईंट्ससह प्रथम स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया 69.23 टक्के पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंड 66.67 पॉईंट्स सह तिसऱ्या स्थानी आहे. अशा स्थितीत जर भारताला अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी उर्वरित सहाही टेस्ट सामने जिंकणे आवश्यक आहे. असे केल्यास त्यांची गुण टक्केवारी  66.67  वर पोहोचेल. मात्र असं झालं तरी सहाही टेस्ट सामने जिंकूनही भारत पहिल्या दोन संघांच्या मागे राहू शकतो. अशा वेळी त्यांना इतर संघांच्या खराब कामगिरीवरही अवलंबून राहावे लागेल.

हेही वाचा : मुंबई इंडियन्सचा महत्वाचा भाग आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, नेमकं काय करतो माहितीये का?

फक्त विजयचं महत्वाचा नाही तर... :

टीम इंडिया जर सहा टेस्ट सामन्यांपैकी जर पाच सामने जिंकते आणि एक सामना ड्रॉव झाला तर त्यांची टक्केवारी 62.96 एवढी असेल, तर पाच विजय आणि एक पराभवाच्या स्थितीमध्ये हा ही टक्केवारी कमी होऊन 61.11 एवढी राहील. अशा परिस्थितीत अंतिम फेरीत पोहोचण्याची आशा जिवंत ठेवण्यासाठी भारताकडे एकच मार्ग आहे.  तो म्हणजे उर्वरित सहाही सामने जिंकणे. याव्यतिरिक्त आगामी महिन्यांत इतर संघांच्या सामन्यांचे निकाल भारताच्या बाजूने लागतील अशी अपेक्षाही त्यांना ठेवावी लागेल.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Team india