• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर संजय राऊतांकडून दोन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर संजय राऊतांकडून दोन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसींकडून बाळासाहेबांचा फोटो फाडला गेल्याने वादाला तोंड फुटलं आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 18, 2026, 14:33 IST|Updated: Nov 18, 2026, 14:55 IST
joinshare
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर संजय राऊतांकडून दोन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
Image Credit: बाळासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर संजय राऊत संतापले

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसींकडून बाळासाहेबांचा फोटो फाडला गेला. शायना एनसी यांच्या कृत्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं असून यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. मुंबई महापालिका सभागृहात बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याचा निषेध करत आंदोलन केलं जात आहे. किशोऱी पेडणेकर यांनी शायना एनसींचा आधी राजीनामा घ्या अशी मागणी केली आहे. खासदार संजय राऊत यांनीही एक्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्यावरुन महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी एक्सवर 'बकवास लेकाचे' अशी पोस्ट शेअर करत दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या पोस्टवर व्यक्त होताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

 

बकवास लेकाचे

— Sanjay Raut (@rautsanjay61) November 18, 2026

 

अतुल लोंढेची पोस्ट

शिंदेंच्या नेत्यांनी अनावधानाने नाही जाणिवपूर्वक बाळासाहेबांचा फोटो फाडला आहे. हीच भाजप RSS च विषवल्ली बाळासाहेबांच्या खांद्यावर चढून महाराष्ट्रात सत्तेवर आली आणि संधी भेटताच बाळासाहेबांची शिवसेना फोडून ती संपवण्याचे षडयंत्र केले. गद्दारसेनेचा निषेध असो असं अतुल लोंढे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

नेमकं काय झालं?

सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पुस्तकात सावरकरांचा अपमान झाल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. 'सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?' अशी विचारणाही त्यांनी केली. शिवसेना नेत्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं. याचवेळी शायना एनसी यांनी चुकून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडला.

 

Shaina NC Balasaheb Thackeray Controversy | निषेधाच्या नादात शायना एनसींनी थेट बाळासाहेबांचाच फोटो फाडला! | Zee24Taas #ShainaNC #BalasahebThackeray #PoliticalControversy #ShivSena #Zee24Taas https://t.co/pxKcl4W7y7

— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 18, 2026

 

सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना शिवसेना नेत्या शायना एनसींकडून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेला. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी शिवसेना प्रवक्त्यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी निषेध करण्याच्या नादात शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेबांचा फोटो फाडला गेला. सोनिया गांधींच्या पुस्तकांमधील फोटो फाडताना हा प्रकार घडला आहे. शायना एनसींच्या या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने ठाकरेंचे नेते आक्रमक झाले आहे.

 

Shaina NC On Balasaheb Thackeray Photo | बाळासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर शायना एनसींचं स्पष्टीकरण | Zee24Taas #ShainaNC #BalasahebThackeray #ShivSena #MaharashtraPolitics #Zee24Taas https://t.co/nAxWJEWO86

— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 18, 2026

 

या वादानंतर शायना एनसींनी सारवासारव केली असून आपण बाळासाहेबांचा नाही मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला असल्याचा दावा केला आहे. आम्ही मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडलाय. एकदा नाही तर 10 वेळा आम्ही मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडू, अशी प्रतिक्रिया शायना एन. सी. यांनी दिली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sanjay Raut
shiv sena
Shiv Sena UBT