SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'बरं झालं...', गोकुळ अध्यक्ष निवडीत सतेज पाटलांचा पराभव होताच संजय राऊतांनी मानले हायकोर्टाचे आभार, 'कोल्हापुरात फडणवीस...'; पोस्ट चर्चेत

गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात अखेर महायुतीने बाजी मारलीय. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांनी विजय मिळवला आहे

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 11, 2026, 09:51 IST | Updated: Nov 11, 2026, 10:02 IST
Image Credit: गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात अखेर महायुतीने बाजी मारली, राऊतांनी मानले कोर्टाचे आभार, पण का?
Join

गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात अखेर महायुतीने बाजी मारलीय. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांनी विजय मिळवला आहे. राजेश पाटील यांना 16 मतं मिळाली, तर समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांना 13 मतांवर समाधान मानावं लागलं आहे. शासननियुक्त संचालकांच्या मतदानामुळे निकालाचं पारडं महायुतीच्या बाजूने झुकलं. या विजयानंतर महायुतीच्या नेत्यांनी जल्लोष करत सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊतांची पोस्ट चर्चेत आहे. कारण यामध्ये त्यांनी उच्च न्यायालयाने विरोधात निर्णय दिल्याने आभार मानले आहेत. पण हे त्यांनी उपहासात्मकपणे म्हटलं आहे. त्यांनी वकील राहुल मखरे यांच्या पोस्टमधील मजकूर शेअर केली आहे. कोल्हापूरात फडणवीस पुरस्कृत मुश्रीफ व चंद्रकांत पाटील हे वळू फडणवीस यांची नौका बुडवतील असा दावाही त्यांनी केला आहे.

संजय राऊतांची पोस्ट

"आमचे चळवळीतील सहकारी एडवोकेट राहुल मखरे यांनी गोकुळ विषयावर फार सुंदर म्हटले आहे. "बरं झालं...उच्च न्यायालयाने चार शासन नियुक्त सदस्यांच्या मतदानाला स्थगिती दिली नाही. स्थगिती दिली असती तर बंटी पाटलांच्या पॅनलचा व्यक्ती चेअरमन झाला असता व विषय संपला असता. महाराष्ट्र भाजपने लोकशाहीवर केलेला बलात्कार विसरून गेला असता. आता पुढील अडीच-तीन वर्ष कोल्हापूर व महाराष्ट्र फडणवीस नियुक्त वळूंनी लोकशाहीला ओरबाडलेले रोज पाहील...आमच्या जखमा जिवंत ठेवेल. जनतेच्या मनातील निखारे कायम तेवत ठेवल्या बद्दल उच्च न्यायालयाचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.” असी पोस्ट संजय राऊतांनी शेअर केली आहे. कोल्हापूरात फडणवीस पुरस्कृत मुश्रीफ व चंद्रकांत पाटील हे वळू फडणवीस यांची नौका बुडवतील असंही ते शेवटी म्हणाले आहेत.


गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत गेम कसा पलटला?

25 पैकी 13 जागांवर बाजी मारल्यावर सतेज पाटलांनी गुलाल उधळला होता. मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीनं डाव टाकत सत्ता काबिज करत जल्लोष केला गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांनी विजय मिळवला आहे. राजेश पाटील यांना 16 मतं मिळाली, तर समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांना 13 मतांवर समाधान मानावं लागलं. शासननियुक्त संचालकांच्या मतदानामुळे निकालाचं पारडं महायुतीच्या बाजूने झुकलं.

 

 


विशेष म्हणजे अध्यक्षपदासाठी मतदान होण्यापूर्वीच महायुतीनं जल्लोष सुरु केला होता. महायुतीकडून राजेश पाटील, तर समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात निवडून आलेल्या 25 संचालकांच्या मतदानाची मोजणी करण्यात आली. यामध्ये समविचारी आघाडीचे शशिकांत पाटील चुयेकर यांना 13 तर महायुतीचे राजेश पाटील यांना 12 मतं मिळाली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात समविचारी आघाडीने एका मताची आघाडी घेतली होती.


मात्र त्यानंतर शासननियुक्त संचालकांच्या मतदानाची मोजणी झाली आणि निकालाचं चित्र बदललं. 3  मतांनी विजय मिळवत राजेश पाटील गोकुळचे नवे अध्यक्ष बनले. या निकालामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षात महायुतीने समविचारी आघाडीवर मात केली. विजयानंतर महायुतीच्या नेत्यांनी थेट सतेज पाटील यांना लक्ष्य केलं. गोकुळ विरोधकांच्या ताब्यात गेलं असतं, तर सहा महिन्यांत त्याचं नाव डी. वाय. पाटील दूध संघ झालं असतं, असा टोला महाडिक यांनी लगावला.

महायुतीच्या नेत्यांची सतेज पाटलावंर टीका

खासदार धनंजय महाडिकांनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सतेज पाटलांना टार्गेट केलं. सतेज पाटलांच्या संपत्तीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी थेट सवाल उपस्थित केले. डी वाय पाटील स्कुटरवरून फिरत होते, आता त्यांच्याकडे इतकी प्रॉपर्टी कुठून आली हे जाहीर करा असे आव्हान दिलं. हम किसी को टोकेंगे नही, लेकिन हमे किसीने टोका तो हम छोडेंगे नाही असा इशारा देत चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांवर जोरदार हल्ला चढविला.

दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यासोबतच्या जुन्या राजकीय संबंधांची आठवण करुन देत टोला लगावला. तुम्ही एवढे मोठे झालेले नाही की माझा हात धराल, अशा शब्दांत सतेज पाटील यांना सुनावलं. 

एकीकडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 16 विरुद्ध 13 अशा मतांनी महायुतीने विजय मिळवलाय. मात्र या निकालानंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. निवडणुकीपूर्वी बहुमताचा दावा करणाऱ्या समविचारी आघाडीला शासननियुक्त संचालकांच्या मतदानामुळे पराभव स्वीकारावा लागलाय. मात्र या निवडणुकीतील वैधानिक आणि न्यायालयीन प्रक्रियेवरून पुढेही संघर्ष सुरू राहणार आहे. त्यामुळे गोकुळची सत्ता महायुतीकडे आली असली, तरी या सत्तेभोवतीचा न्यायालयीन आणि राजकीय संघर्ष अद्याप संपलेला नाही.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES