शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून फडणवीस - शिंदेंवर उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा, दुष्काळावरून शेतकऱ्यांची चेष्टा...
शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर दुष्काळावरून निशाना साधला.
आजचं दृश्य पाहत बसावं असं आहे. पहिले दिवस मला आठवले. सगळीकडे भगवा माहौल, हाच भगवा आता केवळ महाराष्ट्रच्या विधानसभेवर नाही तर लालकिल्ल्यावर फडकावयाचा आहे. मी पहिले सारखं वातावरण याच्यासाठी बोललो ही आपली ओळख आहे. पवित्र भगवा, जो भगवा शिवरायाने घेतला होता, जो भगवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या हातात दिला होता, तोच हा भगवा, निखळ, पवित्र आणि तेजस्वी आहे. निशानीचा भगवा वेगळा ठेवा. पण आपली ओळख कोणी चोरू शकत नाही. कितीही दरोडेखोर येऊ देत पण आमचा भगवा चोरू शकत नाही. आजचा मेळावा विशेष आहे. एकतरी शिवसेना पक्षप्रमुखांचं जन्मष्ताबदी वर्ष आहे. तसंच आपल्या शिवसेनाच्या दसऱ्या मेळाव्याची जी परंपरा आहे, हरित महोत्सवी मेळावा आहे. माझ्या आजोबांनी प्रबोधनकरांनी जो नवरात्रोत्सव सुरु केला होता, त्याचा देखील जन्मष्ताबदी वर्ष आहे. विशेष म्हणजे ज्या शिवाजी पार्कातून शिवसेना प्रमुखांनी आपली शिवगर्जना सर्वप्रथम दिली. पहिला दसरा मेळावा याच शिवतीर्थावर झाला. या मैदानाचं नाव शिवाजी पार्क यालादेखील शंभर वर्ष होतंय. हा संपूर्ण चांगला योगायोग आहे. हा योगायोग तसा कोणी आणला कल्पना नाही, पण शिवसेना पक्षप्रमुखांचं जन्मष्ताबदी वर्ष आणि शिवाजी पार्कचं नामकरण करण्याचे शताब्दीवर्ष म्हणजे मैदानासाठी नेता आणि नेत्यासाठी मैदान हे एकाच वर्षी जन्माला आलं. अशा या पवित्र दिवशी मी आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. असेच सोन्यासारखे राहा आणि देशाला सुद्धा परत एकदा तीच झराळी द्या.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुखांबद्दल अनेक जण बोलतात. त्यांनी जी वाक्य बोलली आहेत, ती आजही आपल्या हृदयात कोरून ठेवली आहे. आजच्या घडीला एक वाक्य मला आठवतेय ते म्हणजे मेलेली मनं कधी क्रांती करु शकत नाही. जिंवत माणसासारखे वागा मुर्दासारखे कदापि वागू नका. दुसरं एक वाक्य त्यांचं होतं क्रांती ही मताची असते आणि शांती ही मुर्दांची असते. मला हेच बोलावसं वाटतं खुराड्यातील कोंबड्यासारख जगू नका. शिवसेना प्रमुख म्हणायचे एकच दिवस वाघाच जगा. शंभर दिवस शेळीचे जगण्यापेक्षा एकच दिवस असा जागा वाघाच्या रुबाबात आपण जगलो पाहिजे. खुराड्यातील कोंबड्या कशा असतात आपल्या कापण्यासाठी मालक तिची मान पकडतो, तीच फक्त कलकलाट करते आणि बाकीच्या कोंबड्या तिची मान पकडलीय माझं काय जातंय. म्हणून गपचुप मालक टाकतात ते दाणे टिपत बसते आणि मस्त लठ्ठ होते. पण तिच्या लक्षात येत नाही, आज तिची मान पकडली आहे, उद्या माझी पण मान पकडणार आहे. मग याच्यापेक्षा मुंग्या बऱ्या. इवश्या असतात. मला अनुभव आहे याच शिवाजी पार्कातील. आता तर तुम्ही खुर्च्यांवर बसल्या आहात. पूर्वीचे आपले मेळावे खाली बसून व्हायचे. मग अनेकदा मुंग्या खाली अशायच्या. मुंग्यावरती पाय पडला, हात पडला तर कोणाचे तरी...तेव्हा त्या चिरडल्या जायच्या. त्या चिरडल्या जात आहे पाहून इतर मुंग्या पळत नाहीत. मग त्या पुसाळून अशा चाव्या घ्यायच्या की जो अवयव त्यांच्या पडेल तो सुजवून टाकतात. आणि पाय कितीही मोठा असला तरी त्याला पळून जावं लागतं. मुंग्यासारखं जीवन जगलं पाहिजे त्या कोंबड्यासारखं जगण्यापेक्षा. याला म्हणतात स्वाभिमान आणि अभिमान.