SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'शस्त्र घेऊन येणारे गुंड तुम्हाला दिसले नाहीत?' उद्धव ठाकरेंचा पोलिसांना सवाल, तर 'चमकेगिरी करणारे लगेच...'

उद्धव ठाकरेंनी दसऱ्या मेळाव्यातून टायगर श्रॉफवरील हल्ल्यावरून पोलिसांवर टीका केली. सोबतच एकनाथ शिंदेंवर ताशेरे ओढले.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 20, 2026, 09:16 PM IST | Updated: Oct 20, 2026, 09:21 PM IST
Image Credit: Uddhav Thackeray on tiger shroff
Join


टायगर श्रॉफवरील हल्ल्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यावर हे चेमकगिरी करणारे गेले लगेचच भेटायला. बरं हा हल्ला झाला आणि पोलिसांनी लगेचच ते हल्लेखोरही पकडले. याच कौतुक करायचं की आणखीन काहीतरी...सुदैव त्या पोराचं म्हणून तो वाचला, जर त्याला गोळी लागली असती तर मग पोलिसांनी हे गुंड पकडले असतील. उपयोग काय चाटायचंय. कोणत्या पद्धतीने सरकार चालवत आहात. संताप याच गोष्टीचा येतो. पोलीस असेल इतर संस्था असतील यांनी स्वत:ची फक्त धुणीभांडी करायची बाकी ठेवलं आहे. बाकी सगळं यांना दिलं आहे.  मग कशाला तुमच्या नाकाबंदी असतात. नवरात्री चालू आहे. आमच्याकडे जरा कुठे काही झालं की लगेचच पोलीस स्टेशनला बोलवतात. या पोलिसांनाही शस्त्र घेऊन येणारी गुंड दिसले नाहीत. नाकामध्ये गोळे कोंबले होते का तुमच्या नाकाबंदीच्या वेळी. हे शस्त्र घेऊन आले कसे. पकडले तुम्ही  जरुर पण जर घात झाला असता कोणत्या तोंडाने तुम्ही टिंगी वाजवली असती.  हे शौर्यपदक देण्याच्या लायकीचे काम नाहीय. मुळामध्ये ते शस्त्र घेऊन आले, ते तु्म्हाला कळायला पाहिजे होतं आणि तिकडे तुम्ही त्यांना उडवायला पाहिजे होतं. तर मी म्हणेल कायद्याचा हा महाराष्ट्र आहे.  पण कोणाला लाज लजा शर्म काही पण नाही.  

गेल्या याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारच्या उच्च न्यायालयामध्ये दावा केला आहे.  महाराष्ट्र शहरी नक्षलवाद्यांचं केंद्र बनलं आहे. कुठल्या महाराष्ट्राच्या कुठल्या शहरात शहरी नक्षलवाद आहे. हे गुंड आले होते ते तुमच्या यूपीमधून आले होते. हे येताना जाताना तुम्हाला दिसले नाही पकडले नाही. मात्र तिकडे जाताना पडकले. येताना तुम्हाला कळले नाहीत.

   

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES