• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात शॉकिंग ट्विस्ट! राधाविषयी एक्स नवऱ्याने दिली धक्कादायक माहिती

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात शॉकिंग ट्विस्ट! राधाविषयी एक्स नवऱ्याने दिली धक्कादायक माहिती

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील राधाविषयी एक्स नवऱ्याने दिली धक्कादायक माहिती दिली आहे. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दोन महिलांना दिल्लीत अटक केली आहे. यामध्ये राधा आणि बबिता यांचा समावेश आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 21, 2026, 11:48 PM IST|Updated: Oct 21, 2026, 11:49 PM IST
joinshare
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात शॉकिंग ट्विस्ट! राधाविषयी एक्स नवऱ्याने दिली धक्कादायक माहिती

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील गोळीबार प्रकरणाशी दोन महिलांना दिल्लीत अटक करण्यात आली. यामध्ये राधा आणि बबिता यांचा समावेश आहे. राधाबद्दल आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. राधाच्या माजी पतीने एएनआयला यासंदर्भातील प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या दोघांचा आता काहीच संबंध नसल्याने त्याने स्पष्ट केलं.
माझा तिच्याशी काहीही संबंध नाही”

राधाचा माजी पती सुनील याने सांगितलं की, “ती पूर्वी माझी पत्नी होती, पण आता आमचा कोणताही संपर्क किंवा नाते राहिलेलं नाही. अनेक वर्षांपूर्वीच आमचा संपर्क तुटला होता. ती सध्या काय करते, कोणत्या गैरकृत्यात सामील आहे किंवा कुठे राहते, याबद्दल मला काहीही माहिती नाही. ती घर सोडून गेल्यापासून आमची भेट झालेली नाही.

2015 मध्ये झालं होतं लग्न

सुनीलने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा विवाह २०१५ मध्ये झाला होता. त्यांना एक मूलही झाले. मात्र, लग्नानंतर सुमारे दीड वर्षांनी ती एका रात्री अचानक घर सोडून निघून गेली आणि तेव्हापासून ती परतली नाही.

राधा बेपत्ता झाल्यानंतर सुनीलने तिचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्न केले. त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आणि न्यायालयात कायदेशीर प्रक्रियाही सुरू केली होती, परंतु त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. अखेर दोन ते तीन वर्षांनंतर त्याने दुसरे लग्न केलं. सुनीलने पुढे सांगितलं की, “ती जोपर्यंत माझ्यासोबत राहत होती, तोपर्यंत तिने कधीही कोणताही त्रास दिला नाही किंवा कोणतेही वाद घातले नाहीत. ती नीट राहत होती, पण घर सोडल्यानंतर ती काय करत होती, याची मला कल्पना नाही.” टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील शस्त्र पुरवठा नेटवर्कशी नाव जोडले गेल्याने आणि पोलीस कारवाईमुळे आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; दिल्लीत  पोलिसांकडून चौघांना अटक   

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी दिल्लीत  पोलिसांकडून चौघांना अटक केली. आरोपींना मुंबईत न्यायालयात हजर  करणार आहेत. कुणाल (२१) आणि सुमित (१९, दोघेही रा. हरियाणा), राधा (२३) आणि बबिता (२३, दोघीही रा. उत्‍तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिलेल्या माहितीनुसार, कुणाल नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. हरसाना गावातील एका मित्राने त्याची ओळख अनिल पंडितशी करून दिली. अनिल पंडित हा मूळचा पानिपतचा असून, तो सध्या अमेरिकेतून गुन्हेगारी कारवाया चालवतो.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Tiger Shroff
crime