रोहित पवार : सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्री पद मिळणार नाही असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले आहे. रोहित पवार यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावं अशी मागणी राष्ट्रवादीने केली. भाजप आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत अर्थखात्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. महायुतीच्या वादात रोहित पवारांनी एन्ट्री करत भाजपवर टीका केली. मात्र, हा आमचा अंतर्गत विषय असून अर्थखात्यावर चर्चा सुरू आहे, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्री पद मिळणार नाही, भाजपला मी फार ओळखतो. त्यामुळे मी भाजपपासून लांब आहे. अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरून घेतलेले आहे, अशा शब्दात आमदार रोहित पवारांनी भाजपवर आरोप केले आहेत.
अर्थखात्यावरुन महायुतीत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. आमच्या हक्काचं अर्थ खातं परत करा अशी मागणी राष्ट्रवादीने महायुतीच्या बैठकीत केली. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर होतं. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात अर्थकात्याचा पदभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेला. पण आता त्याला बरेच महिने उलटले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या हक्काचं असलेलं अर्थखातं भाजपने परत करावं अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते वारंवार करत आहेत.
काही महिन्याआधी सुनील तटकरेंनी यांनी याबद्दल मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा गेतली होती. पण तरिही त्या दिशेने काहीही पावलं न टाकल्यामुळे आता महायुतीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले आहेत. पुण्यात महायुतीच्या समन्वय बैठकीत आमच्या हक्काचं अर्थखातं सुनेत्रा वहिनींना परत द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांनी केली. तर अर्थ खात्याबाबत चर्चा सुरु असल्याचं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी सावध प्रतिक्रिया दिली. तर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनीही खातं परत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
तर, याबाबत मुख्यंत्र्यांचीही प्रतिक्रिया समोर आलीये. याबद्दल आमची चर्चा सुरु आहे त्यात काय ते ठरेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. दुसरीकडे तिन्ही नेते जो निर्णय घेतील तो मान्य करावा लागेल असं शिरसाटांनी म्हटलं. तर हा निर्णय सर्वस्वी मुख्यंत्र्यांचा असल्याचं भाजपच्या नवनाथ बन यांनी म्हटलंय. त्यामुळे अर्थखात्याची मागणी राष्ट्रवादीकडून आक्रमकपणे केली जातेय पण ते परत मिळेलच याबाबत कुठलीही खात्रीलायक भूमिका भाजपकडून घेतली जात नाहीये. त्यामुळे रोहित पवारांनी नेमकं यावरच बोट ठेवत भाजपवर टीका केली.
महायुतीच्या खातेवाटपात अर्थखातं राष्ट्रवादीच्या वाट्याला आलं. पण दादांच्या निधनानंतर ते मुख्यमंत्र्यांकडे आहे. आता युतीच्या समन्वय बैठकीत सत्तेतील वाट्याचा मुद्दा चर्चेत आला. अर्थखात्यावर राष्ट्रवादीकडून जोरकसपणे दावा केला जात आहे. त्यामुळे याबाबत आता काही हालचाली मुक्यमंत्र्यांच्या पातळीवर होतात हे आणि राष्ट्रावदीची मागणी गांभिर्याने घेतली जाते का हे पाहावं लागेल. पण खातं परत घेण्यासाठी अधिवेशनापुर्वी भेटी गाठींचं सत्र सुद्धा पाहायला मिळू शकतं. कारण राज्याच्या आर्थिक नाड्या हातात असणारं हे खातं आहे.