• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /एल निनोचा महाराष्ट्रासह भारतावर गंभीर परिणाम, अन्नधान्याची टंचाई जाणवणार, काय घडणार नेमकं?

एल निनोचा महाराष्ट्रासह भारतावर गंभीर परिणाम, अन्नधान्याची टंचाई जाणवणार, काय घडणार नेमकं?

एल निनोचे गंभीर परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. भविष्यात अन्नधान्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Sep 30, 2026, 08:42 AM IST|Updated: Sep 30, 2026, 08:46 AM IST
joinshare
एल निनोचा महाराष्ट्रासह भारतावर गंभीर परिणाम, अन्नधान्याची टंचाई जाणवणार, काय घडणार नेमकं?
Image Credit: Super El Nino becomes strongest potentially

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. वरुणराजा रुसल्याने राज्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. एल निनोमुळं पावासाचे प्रमाण घटले आहे. इतकंच नव्हे तर सुपर एल निनोमुळं भविष्यात अन्नधान्याची टंचाई आणि पाणीटंचाई जाणवू शकते. याबाबत सविस्तर अहवाल जाणून घेऊयात.

प्रशांत महासागरात एल निनो (El Niño) अधिक बळावल्यामुळे 2026-27 मध्ये भारतात पावसाचे प्रमाण घटण्याची आणि तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. एल निनोचा परिणामधरण साठा, विहिरींचे भूजल आणि बाजारातील अन्नधान्याच्या महागाईवर होणार आहे.

सुपर एल निनो 2026च्या अखेरीस तीव्र होणार असून 2027पर्यंत टिकण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील या बदलाचा परिणाम महाराष्ट्रावर तर होतोच आहे पण सोबतच भारतावरही होणार आहे. यामुळं संपूर्ण भारतात पावसाचे प्रमाण कमी होणार असून धरणांमधील पाणीसाठा आटण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

पाऊस कमी म्हणजे धरणात कमी पाणी, जमिनीत कमी ओलावा, विहिरींमध्ये भूजल पुनर्भरणा कमी, पिकांसाठी पाणी कमी उपलब्ध, काही भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई, कदाचित दुष्काळदेखील आणि या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे अन्नधान्याची महागाई अशी त्याची साखळी असते.

El Niñoचा पुढचा परिणाम बाजारात दिसू शकतो. मान्सून कमी किंवा त्याचे वितरण असमान झाले तर पेरणीची वेळ बदलू शकते, पिकांच्या वाढीच्या निर्णायक टप्प्यावर ओलावा कमी पडू शकतो आणि अंतिमतः उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. 2026मध्ये राज्यातील पावसाची कमतरता सर्व भागांत सारखी राहिलेली नाही. काही भागांत मोठी कमतरता असताना, काही भागांत अधिक पाऊस झाला. त्यामुळे राज्याची किंवा देशाची एकूण पर्जन्यमानाची आकडेवारी स्थानिक पाणीसंकटाची पूर्ण कहाणी सांगत नाही. मराठवाडा आणि विदर्भातील पर्जन्यतूट आणि पिकांवरील परिणाम विशेषत्वाने अधोरेखित झाले आहेत. याचा अर्थ बाजारातही परिणाम एकसारखा होणार नाही. एखाद्या पिकाचे उत्पादन कमी झाले तर त्याची किंमत वाढू शकते दुसऱ्या प्रदेशात चांगले उत्पादन झाले तर तो परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Weather News
Maharashtra News