• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल! सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण; म्हणाल्या '...बाबा ऐकत नाहीत'

शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल! सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण; म्हणाल्या '...बाबा ऐकत नाहीत'

शरद पवार यांना पुन्हा एकदा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 26, 2026, 16:27 IST|Updated: Nov 26, 2026, 16:30 IST
joinshare
शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल! सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण; म्हणाल्या '...बाबा ऐकत नाहीत'
Image Credit: शरद पवार रुग्णालयात दाखल

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

शरद पवारांना पुन्हा एकदा प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे यांनी डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. डॉक्टरांकडून शरद पवारांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान शरद पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले होते.

सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत डॉक्टरांनी शरद पवारांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती दिली आहे. मात्र बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते असंही सांगितलं आहे. बाबांची तब्येत ठीक आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

सुप्रिया सुळेंची पोस्ट -

"डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते. बाबांची तब्येत ठीक आहे. आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार," असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

 

We are admitting Baba to Breach Candy Hospital. It appears to be dehydration. He needs to slow down and travel less, but Baba just doesn't listen. He loves his work far too much. Thank you all for your concern and good wishes.🙏🏻 डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते. बाबांची तब्येत ठीक आहे. आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार. 🙏🏻

— Supriya Sule (@supriya_sule) November 26, 2026

 

दरम्यान शरद पवार यांना आज डिस्चार्ज मिळणार नसून, अजून तीन ते चार दिवस ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार होणार आहेत. डिहायड्रेशनमुळे शरद पवार यांना त्रास जाणवत आहे. डॅाक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला असतानाही प्रवास केल्याने त्रास वाढला असल्याची माहिती आहे.

याआधी 5 नोव्हेंबरला छाती आणि श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील एका डॉक्टरने सांगितलं होतं की, त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर ब्राँकायटिससारख्या आजारावर उपचार सुरू आहेत. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्यांच्यावर 2 नोव्हेंबरपासून उपचार सुरू होते.

रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ञ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पूर्वेझ ग्रांट यांनी सांगितले होते की, प्लुरिटिक वेदनेच्या तक्रारीनंतर पवार यांना सर्वसाधारण तपासणी आणि वैद्यकीय निरीक्षणासाठी दाखल करण्यात आलं होतं. प्लुरिटिक वेदना म्हणजे छातीत होणारी तीव्र, टोचल्यासारखी किंवा जळजळणारी वेदना, जी श्वास घेताना, खोकताना, शिंकताना किंवा हसताना वाढते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sharad Pawar
Supriya Sule