• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /इम्रान खानला देश सोडण्याची नोटीस; मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

इम्रान खानला देश सोडण्याची नोटीस; मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

अभिनेता इम्रान खानला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस देण्यात आली होती. इम्रान खानच्या याचिकेवरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 27, 2026, 06:26 PM IST|Updated: Oct 27, 2026, 06:33 PM IST
joinshare
इम्रान खानला देश सोडण्याची नोटीस;  मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

इम्रान खान :  अभिनेता इम्रान खानला भारत सोडावा लागणार की दिलासा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इम्रान खानला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. इम्रान खानने या नोटिशीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याची सुनावणी आज पार पडली. इम्रान खान यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी इम्रान खान यांच्या याचिकेवरील सुनावणी 2 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली. परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने (FRRO) इम्रान खानला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. या नोटीसविरोधात इम्रानने न्यायालयात धाव घेतली. 

सरन्यायाधीश एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.  पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत देश सोडण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. इम्रान खान याच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी पार पडली. केंद्र सरकार आणि एफआरआरओच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हजर राहणार होते, परंतु त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ते सुनावणीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी  बाजी मांडली. न्यायालयाला सुनावणी 2 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी केली.

वकील व्यंकटेश धोंड आणि परवेझ मेमन हे इम्रान खान यांचे वकिल आहेत. एफआरआरओच्या आदेशानुसार इम्रान खान बुधवारी भारत सोडून जाणार होते अशी माहिती त्यांनी न्यायालयाला दिली. अनिल सिंग यांनी पुढील सुनावणीपर्यंत इम्रान खान यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे तोंडी आश्वासन दिले.

सुनावणीदरम्यान, हस्तक्षेपकर्त्याचे प्रतिनिधित्व करणारे वकील सुभाष झा यांनी इम्रान खान यांच्या याचिकेवर प्राथमिक आक्षेप नोंदवले. सॉलिसिटर जनरल यांना असे आक्षेप घेण्याचा अधिकार आहे, परंतु ज्या हस्तक्षेपकर्त्याच्या याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही, त्याचे प्राथमिक आक्षेप ऐकून घेतले जाऊ शकत नाहीत असा युक्तीवाद धोंड यांनी केला. केंद्र सरकारलाही असेच आक्षेप आहेत का असा प्रश्न खंडपीठाने अनिल सिंग यांना विचारला. या संदर्भातील माहिती उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमधून मिळवता येईल असं सिंग यांनी सुचवले.

मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात एका आंदोलन झाले. या आंदोलनात सहभागी झाल्याने  इम्रान खानवर कारवाई करण्यात आली. यानंतर, एफआरआरओने त्यांना भारत सोडण्याची नोटीस बजावली. खान यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे  .

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Entertainment News