SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आल्या तर.. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास आनंदच होईल असं वक्तव्य खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलंय.. "दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास जनतेचं भलं होईल" असं ओमराजेंनी म्हटलं आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 13, 2026, 21:54 IST | Updated: Nov 13, 2026, 21:54 IST
Join

ओमराजे निंबाळकर : एकीकडे राष्ट्रवादीत विलिनीकरणाची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे दोन्ही शिवसेनेत काय सुरु आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे. आधी रविंद्र धंगेकरांनी दोन्ही शिवसेनेच्या एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं. मग तर ऐन दिवळाची दिवशी आमदार चंद्रकांत रघुवंशींनी शिवसेनेच्या विलिनीकरणाबाबत सूचक विधान केलं. त्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांनीही राऊत कुटुंबाची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय. तर खासदार ओमराजे निंबाळकरांनी शिवसेना एकत्र येण्याबाबत दोनदा आपली भावना व्यक्त केली. त्यामुळं शिवसेना नेत्यांच्या मनात काय चाललंय? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

एकमेकांमधून विस्तवही जात नसलेले ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार का?  सत्ताधारी शिवसेनेचे काही नेते अस्वस्थ आहेत का?  शिवसेनेच्या नेत्यांना एकत्र येण्याची ओढ का लागली?  हे प्रश्न उपस्थित होण्यामागचे कारण म्हणजे खासदार ओमरोज निंबाळकरांची दोन दिवसातील 2 विधानं दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास जनतेचं भलं होईल, असं खासदार ओमराजे निंबाळकरांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आता, पुन्हा एकदा ओमराजेंनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास मलाच सर्वाधिक आनंद होईल असं बोलून दाखवल आहे.  ओमराजेंच्या या विधानामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. 

शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रिया

ओमराजे निंबाळकर यांच्या वैयक्तिक मत... एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील.  एकत्र येणे किंवा विलीनीकरण याबाबत बोलण्याच्या अधिकार मला देखील कोणी दिलेले नाहीत असं उदय सामंत म्हणाले.  दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणावर मंत्री गुलाबराव पाटलांनी रेल्वेचं उदाहरण दिलं होतं.  एकनाथ शिंदे आमचे इंजिन असून इंजिन जिथे असतं तिथे डब्बा असतो त्यामुळे जिकडे आमचे इंजिन जाईल, तिकडे डब्बा जाईल अशी गुलाबरावंनी बोलून दाखवली.  तर दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत मंत्री भरत गोगावले यांनीही महत्वपूर्ण वक्तव्य केलंय. राजकारणात कधीही काही घडू शकतं असं भरत गोगावलेंनी म्हटलंय त्यामुळं दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत प्रत्यक्षात काही राजकीय हालचाली होणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे

राजकारणामध्ये कधीही केव्हाही काहीही होऊ शकतं 

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्यापासून शिवसेनेच्या नेत्यांही एकत्रि‍करणाचा सूर आवळला. ऐन दिवळाची दिवशी आमदार चंद्रकांत रघुवंशींनी शिवसेनेच्या विलिनीकरणाबाबत सूचक विधान केले होते.   उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर तीच शिवसैनिकांसाठी खरी दिवाळी ठरेल असं त्यांनी म्हटल आहे.  त्यानंतर पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी मंत्री प्रताप सरनाईकांनी थेट खासदार संजय राऊतांचं निवासस्थान गाठलं आपण संजय राऊत यांच्या मातोश्रींना भेटण्यासाठी आल्याचं सरनाईकांनी स्पष्ट केलं.  पण राजकारणामध्ये कधीही केव्हाही काहीही होऊ शकतं असा बॉम्बेही सरनाईकांनी फोडला होता

ओमराजेंसह 6 खासदारांना काही महिन्यापूर्वीच ठाकरेंची साथ सोडली

ओमराजेंसह 6 खासदारांना काही महिन्यापूर्वीच ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. सत्ताधारी पक्षात असूनही ओमराजेंना मित्रपक्षाच्या नेत्यांकडून म्हणावा तसा मान मिळत असल्याचं समोर आले. अशा परिस्थितीत शिवसेना एकत्र येण्याबाबत त्यांनी 2 वेळा भावना व्यक्त करणं याला वेगळच महत्त्व प्राप्त आहे. कारण सत्तेत असूनही त्यांची कोंडी होतेय का हा प्रश्न उपस्थित होत आहे.  लाचाराचं जीणं असल्यानं स्वगृहाची आठवण होत असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.   तुमच्या आठमुठेपणामुळेच पक्ष फुटला असं टीकासस्त्र संजय शिरसाट यांनी डागले. 

शिवसेनेच्या नेत्यांची वक्तव्ये पाहता दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात यासाठी पडद्यामागे खरंच काही घडामोडी सुरु आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. याशिवाय शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे.

या प्रकरणाचा लवकरच निकाल लागेल असं बोललं जात आहे. त्याआधी काही घडामोडी दोन्ही शिवसेनेत घडतात का? की मित्रपक्षांवर दबाव निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्ये केली जात आहेत? अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES