SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

गणपतीत रेकी, हत्येआधी सिक्रेट मिटींग, बड्या राजकीय नेत्याचा कट; प्रदीप पुर्णेकरांना कसं सपवलं? मुलाने सगळंच सांगितलं

मंगळवारी रात्री ठाण्याच्या मानपाडा परिसरात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Sep 30, 2026, 10:27 AM IST | Updated: Sep 30, 2026, 11:32 AM IST
Image Credit: गणपतीत रेकी, हत्येआधी सिक्रेट मिटींग, बड्या राजकीय नेत्याचा कट
Join

मंगळवारी ठाण्याच्या मानपाडा परिसरात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पूर्णेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यानंतर मनोरमा नगर परिसरासह ठाण्यात खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्णेकरांवर प्राणघातक हल्ला करण्यासाठी पाच जण आले होते. त्यांनी त्यांच्यावर चार राऊंड फायरिंग करण्यात आली आहे. पूर्णेकर मानपाड्यातील कार्यालयात असताना दोघांच्या त्यांच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या प्रकारानंतर रुग्णालयाबाहेर जमलेल्या जमावानं घोडबंदर मार्गावर ठिय्या आंदोलन केलं. तसेच गुन्हेगाराला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात पाच संशयित मारेकरी आहेत. निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि अनोळखी आहेत. यातील आरोपी पप्या शिंदे आणि आकाश निमसे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. क्राईम ब्रांच चे पथक देखील शोध घेत आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले आहे.

दरम्यान प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पुर्णेकर आणि भाऊ जयनाथ पुर्णेकर यांनी अनेक गंभीर आरोप केल्यामुळे या प्रकला वेगळेच वळण आलंय. प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येमागे ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांया हात असल्याचा आरोप पुर्णेकरांच्या कुटुंबियांनी केला आहे. 

प्रदीप यांच्या मुलगा  राम पुर्णेकर यांनी आरोप केला आहे की, या हत्येच्या काही दिवस आधी राजा शिंदे यांनी हल्लेखोरांसोबत सिक्रेट मिटींग घेतली होती. हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं.

ते पुढे म्हणाले की, दीड वर्षापूर्वी पप्पांनी मला मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे या दोघांबद्दल सांगितलं होतं. हे लोकं मला मारायच्या प्रयत्नात आहेत, असं ते म्हणाले होते. या लोकांनी माझ्या पप्पांना कॉल करून धमकीही दिली होती. ही धमकी सर्वांनी ऐकलेली की बाळूला आम्ही जीवे मारून टाकणार आहे. आता चार दिवस आधी म्हणजेच विसर्जनच्या एक दिवस अगोदर राजेंद्र शिंदे आणि हे चार-पाच जे आरोपी आहेत. त्यांची नीलकंठ ग्रीन्सला एक मिटींग केली होती. इथेच मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे राहतात. माझ्यासोबत अजून दोन जण होते ज्यांनी त्या दोघांना पाहिलं आहे. फक्त राजेंद्र शिंदे होता, मीनाक्षी नव्हती, असंही त्यांनी सांगितलं. माझ्या पप्पांना जोपर्यंत न्याय नाही भेटत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही किंवा माझ्या डॅडची बॉडी आम्ही लोकं इथून नेणार नाही, असं त्यांनी सांगितलं. 

ते पुढे म्हणाले की, या लोकांची प्लॅनिंग खूप आधीपासून सुरु होती. कालही त्यांच्याकडून हत्या करण्याच्या प्रयत्नात केला होता पण त्यांचा प्लॅन अशस्वी झाला होता. कारण त्यावेळी आम्ही सगळे तिथे उपस्थितीत होतो. आज कोणीच नव्हतं आणि त्यांनी संधी साधली. 


यावेळी प्रदीप पूर्णेकर यांचे बंधू आणि माजी नगरसेवक जयनाथ पुर्णेकर यांनीही याबाबत खळबळजनक आरोप केला आहे. हा सगळा प्रकार गणपतीपासून सुरू असून मी सर्व आरोपींना ओळखत होतो. त्या आरोपींना मोठं करायचं काम आम्हीच केलं. त्यांना तीन चार केसेसमधून मी स्वत: वाचवलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES