SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'वाटलं टायर फुटला अन् छातीत प्रचंड वेदना...', टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान म्हणाला, 'घरी प्रेग्नेंट बायको...'

टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाला तेव्हा रिक्षाचालक आणि चाहता उमेश चौहानदेखील जखमी झाला. नेमकं त्यावेळी काय झालं याबद्दल त्याची रुग्णालयातून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 20, 2026, 05:40 PM IST | Updated: Oct 20, 2026, 05:45 PM IST
Image Credit: umesh Chauhan statement
Join

अभिनेता टायगर श्रॉफवर जीवघेणा हल्ला करण्यात आला, याघटनेमुळे महाराष्ट्रासह बॉलिवूड हादरला आहे. मुंबईत बॉलिवूडमधील कलाकार जेव्हा कुठे येतात, तेव्हा त्यांना पाहण्यासाठी त्यांच्यासोबत एक सेल्फी किंवा ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहते एकच गर्दी करतात. जेव्हा टायगर श्रॉफ हा जुहूमधील पुष्पा पार्क मैदानातून कारमधून बाहेर पडत असताना चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी उभे होते. पण जसा टायगर श्रॉफची कार गेटच्या बाहेर आली पुढच्या क्षणात त्याच्यावर बेछुट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला. पण या गोळीबारात टायगर श्रॉफचा ड्रायव्हर, एक चाहत्या गंभीर जखमी झाला आहे. या चाहत्याच्या छातीला गोळी लागली होती. हल्ल्यानंतर या चाहत्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्या चाहत्याचे नाव उमेश चौहान असं आहे. त्याच्यावर सध्या केएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

हेसुद्धा वाचा - 'वाटलं टायर फुटला अन् छातीत प्रचंड वेदना...', टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान म्हणाला, 'घरी प्रेग्नेंट बायको...'

रुग्णालयातूनच उमेश चौहानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. घटनेच्या वेळी नेमकं काय झालं होतं, याबद्दल उमेश चौहान याने सांगितलं आहे. त्याने सांगितलं की, तो रिक्षातून विले पार्ले वेस्ट इथून जात होता. टायगर श्रॉफ दिसल्यामुळे तो तिथे थांबला आणि हा हल्ला झाला. टायगर श्रॉफ गाडीतून गेटच्या बाहेर कारमधून खेळून आला. त्यावेळी साधारण सात वाजले असतील. कारमध्ये टायगर श्रॉफ कारमध्ये ड्राव्हरल सीटच्या बाजूला बसला होता. मी टायगर श्रॉफ ज्या बाजूने बसला होता, त्या बाजूने कारच्या जवळच उभा होतो. मी व्हिडीओ शूट करत होतो. पुढच्या क्षणी जोराचा आवाज आला. सुरुवातीला मला वाटलं, कारचा टायर फुटल्याचा आवाज वाटला. पुढच्या क्षणी माझ्या छातीत दुखायला लागलं. मी लोकांना मदत करायला हाक मारली. मला श्वास घेता येत नाहीय. मला पंप करा अशी मी लोकांना मदत मागितली. मला कपूर रुग्णालयात नेण्यात आलं. मला कूपर रुग्णालयात नेल्यानंतर समजलं की मला गोळी लागली आहे. मला तोपर्यंत वाटत होतं, मला हृदयविकाराचा झटका आला आहे.

 दरम्यान डॉक्टरांनी सांगितलं आता त्याची प्रकृती चांगली आहे. त्याच्या पोटाची आणि पेल्विसची एंजियोग्राफी करण्यात आली आहे. तर त्याला गोळी लागली असली तरी त्याच्या हृदयाचे किंवा फुफ्फुसांचे अधिक नुकसान झाले नाही. गोळी लागल्यानंतर त्याला तातडीने रिक्षाने रुग्णालयात आणण्यात आले. त्यामुळे त्याच्यावर लवकर उपचार करणे आणि त्याच्या जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आलं. दरम्यान मंगळवारी टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ यांनी उमेशची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. शिवाय त्याला मदतीचे आश्वासनही दिलं आहे.

उमेश चौहान हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. उदरनिर्वाहासाठी मुंबईत रिक्षा चालक आहे. त्याच्या घरी  8 महिन्यांची गरोदर बायको, सहा वर्षांचा लहान मुलगा आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES