अभिनेता टायगर श्रॉफवर जीवघेणा हल्ला करण्यात आला, याघटनेमुळे महाराष्ट्रासह बॉलिवूड हादरला आहे. मुंबईत बॉलिवूडमधील कलाकार जेव्हा कुठे येतात, तेव्हा त्यांना पाहण्यासाठी त्यांच्यासोबत एक सेल्फी किंवा ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहते एकच गर्दी करतात. जेव्हा टायगर श्रॉफ हा जुहूमधील पुष्पा पार्क मैदानातून कारमधून बाहेर पडत असताना चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी उभे होते. पण जसा टायगर श्रॉफची कार गेटच्या बाहेर आली पुढच्या क्षणात त्याच्यावर बेछुट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला. पण या गोळीबारात टायगर श्रॉफचा ड्रायव्हर, एक चाहत्या गंभीर जखमी झाला आहे. या चाहत्याच्या छातीला गोळी लागली होती. हल्ल्यानंतर या चाहत्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्या चाहत्याचे नाव उमेश चौहान असं आहे. त्याच्यावर सध्या केएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
रुग्णालयातूनच उमेश चौहानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. घटनेच्या वेळी नेमकं काय झालं होतं, याबद्दल उमेश चौहान याने सांगितलं आहे. त्याने सांगितलं की, तो रिक्षातून विले पार्ले वेस्ट इथून जात होता. टायगर श्रॉफ दिसल्यामुळे तो तिथे थांबला आणि हा हल्ला झाला. टायगर श्रॉफ गाडीतून गेटच्या बाहेर कारमधून खेळून आला. त्यावेळी साधारण सात वाजले असतील. कारमध्ये टायगर श्रॉफ कारमध्ये ड्राव्हरल सीटच्या बाजूला बसला होता. मी टायगर श्रॉफ ज्या बाजूने बसला होता, त्या बाजूने कारच्या जवळच उभा होतो. मी व्हिडीओ शूट करत होतो. पुढच्या क्षणी जोराचा आवाज आला. सुरुवातीला मला वाटलं, कारचा टायर फुटल्याचा आवाज वाटला. पुढच्या क्षणी माझ्या छातीत दुखायला लागलं. मी लोकांना मदत करायला हाक मारली. मला श्वास घेता येत नाहीय. मला पंप करा अशी मी लोकांना मदत मागितली. मला कपूर रुग्णालयात नेण्यात आलं. मला कूपर रुग्णालयात नेल्यानंतर समजलं की मला गोळी लागली आहे. मला तोपर्यंत वाटत होतं, मला हृदयविकाराचा झटका आला आहे.
Mumbai, Maharashtra: Umesh Chavan, injured in the firing incident involving actor Tiger Shroff, says, "That day, Tiger Shroff Sir was leaving after playing around 7:00 PM in the evening. When his car exited through the gate, I was standing right near the window, very close to where Tiger Shroff Sir was seated. I was recorded a video. Suddenly, there was a sound, I thought it was a tire bursting. Right after that, I started experiencing severe chest pain. I started shouting and crying out for help, saying, 'Man, my chest hurts, someone please pump my chest, I can't breathe'. I had no idea I had been shot. Only after I was brought to Cooper Hospital did I find out that a bullet had hit me. Initially, I thought I was having a heart attack. After some initial check-ups at the hospital, they transferred me here." (Video Source: Third Party)
— IANS (@ians_india) October 20, 2026
दरम्यान डॉक्टरांनी सांगितलं आता त्याची प्रकृती चांगली आहे. त्याच्या पोटाची आणि पेल्विसची एंजियोग्राफी करण्यात आली आहे. तर त्याला गोळी लागली असली तरी त्याच्या हृदयाचे किंवा फुफ्फुसांचे अधिक नुकसान झाले नाही. गोळी लागल्यानंतर त्याला तातडीने रिक्षाने रुग्णालयात आणण्यात आले. त्यामुळे त्याच्यावर लवकर उपचार करणे आणि त्याच्या जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आलं. दरम्यान मंगळवारी टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ यांनी उमेशची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. शिवाय त्याला मदतीचे आश्वासनही दिलं आहे.
उमेश चौहान हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. उदरनिर्वाहासाठी मुंबईत रिक्षा चालक आहे. त्याच्या घरी 8 महिन्यांची गरोदर बायको, सहा वर्षांचा लहान मुलगा आहे.