मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार टायगर हा जुहूला फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. घरी परत असताना गाडी पुष्पा पार्क परिसरातून बाहेर येताच दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्या कारवर गोळीबार केला. त्यानंतर हे दोघे मारेकरी एका बाइकवर पहिलेपासून असलेल्या एका तरुणासोबत तिथून पळून गेलेत. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. एका ऑडिओ क्लिपमधून सलमान खानला धमकी देत संपूर्ण बॉलिवूडला मारण्याची धमकी दिली आहे. टायगर श्रॉफच्या पूर्वी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर हल्ला करण्यात आला आहे.
12 ऑक्टोबर 2024 - बाबा सिद्दीकी यांची हत्या
14 एप्रिल 2024 - सलमान खान याचे निवासस्थान
2025 - कपिल शर्मा - कॅनडातील एका कॅफेवर गोळीबार. अनेक गोळ्या झाडण्यात आल्या, आणि सलमान खानला एका उद्घाटनासाठी आमंत्रित करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
29 ऑक्टोबर 2025 - चन्नी नट्टन यांच्या कॅनडामधील घरावर गोळीबार
1 फेब्रुवारी 2026 - दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार
जून 2026 - पंजाबी गायक एपी ढिल्लनच्या कॅनडातील घरावर गोळीबार
18 ऑक्टोबर 2026 - टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारे अनिल पंडित आणि हरमन संधू कोण आहे?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल पंडित पानिपतचा रहिवासी असून सध्या तो अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये असल्याचे म्हटलं जातंय.
अनिल पंडितने दिल्लीतील पश्चिम बिहारमध्ये सलमान खानचा जवळचा सहकारी गुरू रंधावाच्या जिमवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.
त्यावेळी, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अनिल पंडितच्या चार शूटरना अटक केली होती.
हरमन संधू देखील अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आहे. शुभम लोंकरही त्याच्यासोबत ही टोळी चालवतो.
हरमन, एक गुंड, पंजाबचा रहिवासी आहे.