• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मुंबईवरुन ‘या’ मार्गावर धावणार स्लीपर वंदे भारत; प्रवासाचे 8 तास वाचणार! पाहा Timetable, तिकीट दर, स्टेशन्सची यादी

मुंबईवरुन ‘या’ मार्गावर धावणार स्लीपर वंदे भारत; प्रवासाचे 8 तास वाचणार! पाहा Timetable, तिकीट दर, स्टेशन्सची यादी

वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच मुंबईमधून धावणार आहे. ही ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार? कोणत्या दिवशी आणि किती वाजता धावणार? या ट्रेनमुळे नक्की कोणाला आणि कसा फायदा होणार? जाणून घ्या यासंदर्भात सविस्तर माहिती एकाच ठिकाणी...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 03, 2026, 12:55 PM IST|Updated: Oct 03, 2026, 01:15 PM IST
joinshare
मुंबईवरुन ‘या’ मार्गावर धावणार स्लीपर वंदे भारत; प्रवासाचे 8 तास वाचणार! पाहा Timetable, तिकीट दर, स्टेशन्सची यादी
Image Credit: समोर आले यासंदर्भातील सर्व तपशील (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईहून सुटणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी धावणार? किती आणि कोणते थांबे तिला असणार? यासंदर्भातील सर्व माहिती समोर आली आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन मुंबई ते बंगळूरू या मार्गावर चालवली जाणार आहे. रेल्वे बोर्ड लवकरच एसएमव्हीटी बंगळूरु-मुंबई सीएसएमटी वंदे भारत स्लीपर ट्रेनची अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. याच महिन्यामध्ये म्हणजेच दिवाळीपूर्वी ऑक्टोबरमध्ये या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाऊ शकतो. या ट्रेनच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या राजधानीची शहरं अधिक जवळ येतील. या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ या स्लीपर वंदे भारतमुळे कमी होणार आहे.

नेमका किती वेळ वाचणार?

गेल्या तीन दशकांपासून प्रवासी मुंबई आणि बंगळूरु दरम्यान सुपरफास्ट रेल्वे सेवेची मागणी करत आहेत. या ट्रेनच्या सुरू होण्यामुळे केवळ बिझनेस क्लासच्या प्रवाशांनाच नव्हे, तर सामान्य प्रवासी आणि पर्यटकांनाही आधुनिक आणि आरामदायक स्लीपर प्रवासाचा अनुभव मिळेल, असे सांगितले जात आहे. ही वंदे भारत स्लीपर ट्रेन रात्रीचा प्रवास अधिक वेगवान आणि आधुनिक बनवेल. सध्या मुंबई-बंगळुरु या दोन शहरांदरम्यान उद्यान एक्सप्रेस ही एकमेव दैनंदिन थेट धावणारी ट्रेन आहे.  मुंबई, सीएसएमटी (CSMT) ते बंगळुरू, केएसआर (KSR) दरम्यान धावणारी वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे या दोन शहरांतील प्रवास 16 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करेल. उद्यान एक्सप्रेसला मुंबई-बंगळुरु अंतर कापायला सरासरी 24 तास लागतात.

किती दिवस धावणार?

भारतीय रेल्वेची ही फ्लॅगशिप प्रिमियम ट्रेन मुंबई ते बंगळुरू या मार्गावर आठवड्यातून सहा दिवस दोन्ही दिशांना धावेल, असं सांगण्यात येत आहे. ही ट्रेन मुंबईहून मंगळवार वगळता सर्व दिवस धावेल. तर बंगळुरू येथून ही ट्रेन सोमवार वगळता सर्व दिवस सुटेल. यामध्ये एकूण 16 एसी डबे असतील.

कधी सुटणार?

प्रस्तावित वेळापत्रकानुसार, मुंबईहून निघणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन रात्री 10.30 वाजता सुटेल. यानंतर वाडी, धर्मावरम या मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी 2.50 वाजता बंगळुरू येथे पोहोचेल. तसेच बंगळूरु येथून मुंबईकडे येणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन रात्री 10 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1.50 वाजता मुंबईत पोहचणं अपेक्षित आहे.  

कोणत्या स्थानकांवर थांबणार? तिकीट किती?

स्लीपर वंदे भारत ट्रेन मुंबई ते बंगळुरू या मार्गादरम्यान कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, रायचूर, गुंटकल, अनंतपूर या स्थानकांवर थांबणार आहे.   वंदे भारत स्लीपर ट्रेनची रचना अत्यंत आधुनिक असणार आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनचं तिकीट राजधानी एक्सप्रेसपेक्षा सुमारे 20 टक्के जास्त असण्याची शक्यता आहे.

थर्ड एसी: प्रति किलोमीटर अंदाजे ₹2.49 (जीएसटी अतिरिक्त)
सेकेंड एसी: प्रति किलोमीटर अंदाजे ₹3.10 (जीएसटी अतिरिक्त)
फर्स्ट एसी: प्रति किलोमीटर अंदाजे ₹3.80 (जीएसटी अतिरिक्त)

कोणते डबे कसे असणार? किती प्रवासी प्रवास करु शकतात?

या ट्रेनमध्ये 823 प्रवाशांसाठी बसण्याची आणि झोपण्याची सोय असेल. ट्रेनच्या रेकची प्राथमिक देखभाल केएसआर किंवा एसएमव्हीटी बंगळूरु येथेही केली जाऊ शकते. या वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील 16 पैकी 11 कोच हे 3 एसी, 4 कोच 2 एसी आणि एक कोच 1 एसी डब्याचा असेल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Railway News
Mumbai News
Mumbai