• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /आता लक्ष 12 नोव्हेंबरकडे कारण... 'या' ठिकाणी तर कसर भरल्यानंतरही धो-धो कोसळणार; हवामान खात्याकडून Good News

आता लक्ष 12 नोव्हेंबरकडे कारण... 'या' ठिकाणी तर कसर भरल्यानंतरही धो-धो कोसळणार; हवामान खात्याकडून Good News

महाराष्ट्रामधील 300 हून अधिक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असतानाच आता हवामान खात्याने दिलासा देणारा एक अत्यंत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. नेमकं काय म्हटलंय हवामान विभागाने जाणून घ्या सविस्तर...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 16, 2026, 09:53 AM IST|Updated: Oct 16, 2026, 10:07 AM IST
joinshare
आता लक्ष 12 नोव्हेंबरकडे कारण... 'या' ठिकाणी तर कसर भरल्यानंतरही धो-धो कोसळणार; हवामान खात्याकडून Good News
Image Credit: हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य एआयवरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

राज्यात ऑक्टोबर हिटचा कहर जाणवत असतानाच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. परतीच्या वाटेवर असलेला मान्सून महाराष्ट्राच्या काही भागांत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने थेट तारखांसंहीत यासंदर्भातील अंदाज व्यक्त करताना नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात...

हा अंदाज काय? तारखा कोणत्या?

15 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीसाठी वर्तवलेल्या विस्तारित हवामान अंदाजानुसार, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागांमध्ये पुढील महिन्याभरात पावसाची दाट शक्यता आहे. मात्र, पावसाचे नेमके ठिकाण आणि त्याची तीव्रता याबाबत हवामान विभागाच्या पुढील अंदाजावर लक्ष ठेवावे लागणार आहे.

अचानक का पडणार पाऊस?

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 15 ते 18 ऑक्टोबरदरम्यान दक्षिण भारतातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात हवामान प्रणाली विकसित होण्याचे संकेत मिळत असल्याने या अंदाजाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 18 ऑक्टोबरच्या आसपास पावसाची प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून, त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांतही पाऊस पडू शकतो.  हवामान विभागाच्या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, पहिल्या आठवड्यात म्हणजे 15 ते 22 ऑक्टोबरदरम्यान दक्षिण भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात ईशान्य मोसमी पावसालाही सुरुवात झाली आहे.

इथं धो धो कोसळणार

22 ते 29 ऑक्टोबरदरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे असून तो कुठे पडू शकतो याचं ठिकाणी वर्तवण्यात आलं आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस  केरळ आणि तामिळनाडूमध्ये पडण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या काही अन्य भागांतही पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

किती पाऊस पडणार हे 'या' घटकावर अवलंबून

देशातील एका मोसमी पावसाचा हंगाम संपला असला, तरी दक्षिण भारतासह काही भागांत पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 15 ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी पावसाने संपूर्ण देशातून माघार घेतली आहे. दक्षिण भारताच्या आग्नेय द्वीपकल्पीय भागात ईशान्य मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचा हा अंदाज विस्तारित कालावधीसाठी असल्याने किती पाऊस पडेल, हे हवामान प्रणालीची स्थिती आणि तिच्या हालचालींवर अवलंबून असल्याचं हवामान खात्याकडून सूचित करण्यात आलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Weather
Weather News