• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /रोहित पवार काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? सतेज पाटील यांचे 2 वाक्यात उत्तर; राजकारणात मोठं काही तरी घडणार?

रोहित पवार काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? सतेज पाटील यांचे 2 वाक्यात उत्तर; राजकारणात मोठं काही तरी घडणार?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. अशातच रोहित पवार काय भूमिका घेणारयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Reported ByVanita Kamble
Published: Nov 27, 2026, 23:36 IST|Updated: Nov 27, 2026, 23:41 IST
joinshare
रोहित पवार काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? सतेज पाटील यांचे 2 वाक्यात उत्तर; राजकारणात मोठं काही तरी घडणार?

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

रोहित पवार :  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. निर्णय जाहीर करण्याआधी पक्षाच्या बैठकीत रोहित पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची वेगळी भूमिका घेतली. रोहित पवार यांनी डिलिमिटेशन बिलाला विरोध केला. डिलिमिशन बिलाला पाठिंबा देऊ नका अशी भूमिका रोहित पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पांठिंबा जाहीर करत रोहित पवारांना धक्का दिला आहे. यामुळे आता रोहित पवारांची पुढची राजकीय वाटचाल कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच रोहित पवार काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दोन वाक्यात उत्तर दिले आहे. 

राष्ट्रवादीने अखेर डिलीमिटेशन बिलाला पाठिंबा दिला आहे.  जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंब्याची घोषणा केली. रोहित पवारांचीही ब्रीच कँडीतली भेट ठरली निष्फळ ठरल्याची देखील चर्चा आहे.  डिलीमीटेशन बिलास पाठिंबा दिल्यास पक्षाला नुकसान होईल, असं रोहित पवारांनी शरद पवारांना सांगितले. पण शरद पवार 'त्या' मुद्यावर एक शब्दही बोलले नाही अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आता रोहित पवार काय करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  पक्षात राहूनच रोहित पवार पक्ष भूमिकेला विरोध करणार की जाहिर केल्याप्रमाणे वेगळी वाट निवडणार? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.  रोहित पवारांची पक्षात पुन्हा कोंडी होण्याची शक्यता आहे. आधी ट्रँक्टर मोर्चाला विरोध आणि आता डिलीमीटेशन वरुन वेगळी भूमिका.

रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा

रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा आहे. रोहित पवार यांच्या काँगेस प्रवेशाबाबत  सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 
काँग्रेस पक्षाकडून कुठली प्रस्ताव रोहित पवार यांना नाही किंवा त्यांच्याकडून काँग्रेसला नाही असं सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.  30 नोव्हेंबरनंतर काय घडणार याकडे लक्ष असल्याचे सतेज पाटील म्हणाले. 
राष्ट्रवादीचं विलीनीकरणाच्या चर्चेवेळेस देखील रोहित पवार वेगळी भूमिका घेणार असल्याची चर्चा रंगली होती. कोणत्याही परिस्थितीत बाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Rohit Pawar
Maharashtra Politics
Political News