SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सूनेच्या हातात iPhone पाहून सासूला आली शंका, नंतर समोर आलं धक्कादायक सत्य! नागपुरातील हादरवणारी घटना

नागपुरात सूनेचा पराक्रम पाहून सासूला धक्का बसला असून यासंदर्भात ठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 10, 2026, 09:49 IST | Updated: Nov 10, 2026, 09:55 IST
Image Credit: आयफोन घेण्यासाठी सासूचे दागिने चोरले
Join

आयफोन घेण्यासाठी एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते हे दर्शवणारी एक घटना सध्या चर्चेत आहे. आयफोनसाठी सूनेने केलेला पराक्रम पाहून सासूच्या पायाखालची जमीनच हादरली आहे. यानंतर सासूने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या सूनेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. चौकशीदरम्यान सूनेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

नेमकं काय घडलंय?

नागपूरमधील सूनेनेच आपल्या सासूचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे सूनेने सुमारे 53 ग्रॅम सोन्याचे दागिने विकून त्यातून मिळालेल्या पैशातून आयफोन (iPhone) खरेदी केला. चोरीला गेलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत अडीच लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर शांतीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

नागपूरच्या शांतीनगर परिसरात ही घटना घडली आहे. 52 वर्षीय महिलेने याप्रकऱणी तक्रार दाखल केली आहे. ही महिला प्रेमनगर येथे वास्तव्यास आहे. तक्रारीनुसार, 27 जुलै 2026 रोजी त्यांना शिर्डीला दर्शनासाठी जायचं होतं. प्रवासाची तयारी करण्यासाठी त्यांनी कपाट उघडलं असता सोन्याचे दागिने गायब असल्याचं लक्षात आलं. यानंतर महिलेने घरातील सदस्यांकडे यासंदर्भात विचारणा केली. मात्र सर्वांनीच आपल्याला यासंदर्भात काही कल्पना नसल्याचं सांगितलं. बराच वेळ शोध घेऊनही दागिने सापडले नाहीत.

चौकशीदरम्यान दागिने विकून iPhone घेतल्याची कबुली

महिलेला यादरम्यान आपली सून ग्रंथाली वर्मावर संशय आला. यानंतर तिने सूनेकडे चौकशी केली असता तिने दागिने विकून त्या पैशातून आयफोन घेतल्याची कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रंथाली कधी माहेरी तर कधी सासरी येत जात असे. कौटुंबिक वाद सुरु असतानाच हे दागिने गायब झाले होते.

मंगळसूत्र आणि हारासह एकूण 53 ग्रॅम सोन्याचे दागिने गायब

तक्रारीनुसार, गायब झालेल्या दागिन्यांमध्ये सुमारे 30 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, 13 ग्रॅमचा सोन्याचा हार आणि इतर 10  ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे. एकूण 53 ग्रॅम सोन्याचे दागिने गायब असून, त्यांची अंदाजे किंमत अडीच लाख रुपये इतकी आहे.

जेव्हा त्या महिलेने आपल्या सुनेकडे दागिने परत मागितले, तेव्हा तिने ते देण्यास नकार दिला. त्यानंतर, त्या महिलेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. शांतीनगर पोलिसांनी ग्रंथली आकाश वर्मा हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय कामटे यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES