• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नागपूर
  • /मध्यरात्री व्यापाऱ्याच्या घरासमोर मोठा थरार, 3.45 कोटींचा दरोडा टाकला अन् ड्रायव्हरला , नागपुरातील थरारक घटना

मध्यरात्री व्यापाऱ्याच्या घरासमोर मोठा थरार, 3.45 कोटींचा दरोडा टाकला अन् ड्रायव्हरला , नागपुरातील थरारक घटना

नागपूरच्या तुळशीनगर परिसरात मोठी लूट घडवून आणली आहे. तब्बल पावणे चार कोटी रुपये लुटारुनी लुटून नेल्याची माहिती

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 18, 2026, 13:33 IST|Updated: Nov 18, 2026, 13:37 IST
joinshare
मध्यरात्री व्यापाऱ्याच्या घरासमोर मोठा थरार, 3.45 कोटींचा दरोडा टाकला अन् ड्रायव्हरला , नागपुरातील थरारक घटना
Image Credit: Major robbery in the Tulshi Nagar area of ​​Nagpur staggering 375 crore rupees

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नागपुरात एका व्यापाऱ्याच्या घराजवळून लुटल्याची घटना घडली आहे. या व्यापाऱ्याची तब्बल 3.45 कोटी रुपयांची रोकड लंपास केली आहे. इतकंच नव्हे तर, चोरट्यांनी व्यापाऱ्याची कार पळवून नेल्याचंही समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागपूर पोलिसांकडून याचा चोरट्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.  

सुरेश परमार नावाच्या व्यापाऱ्याच्या घराजवळून त्यांच्या वाहन चालकाच्या ताब्यातून कार पळवून घेऊन जात अज्ञात लुटारूंनी तब्बल पावणेचार कोटींची रोकड लुटल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा सुरेश परमार यांचे वाहन चालक मोहन राव कार आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड घेऊन निघत असताना अज्ञात लुटारूंनी चाकूचा धाक धडकून कार पळवून नेली. नागपूर जिल्ह्याच्या खैरी भागात लुटारूंनी पळवून नेलेली कार सोडून देत त्याच्यातील रोकड सोबत नेल्याची माहिती आहे.

सध्या नागपूर पोलिसांचे विविध पथक लुटारूंचा शोध घेत आहे. लुटारुंनी व्यापारी सुरेश परमार यांच्या घरासमोरील गार्डला चाकूने जखमी केल्याची ही माहिती आहे.  मिळालेल्या माहितीनुसारी, लुटारुंनी व्यापारी सुरेश परमार यांच्या घरासमोरील गार्डला चाकूने जखमी केल्याचीही माहिती आहे. तसंच, चोरी केलेली गाडी खैरी गावाजवळ सोडल्याचे पोलिस तपासात आढळले आहे. सुरेश परमार हे जालना येथील आहेत.

आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

महाराष्ट्रातसह देशभरातील महिला सरपंच आणि ग्रामसेवकांना टार्गेट करून खंडणी उकळणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश नागपूर ग्रामीण पोलिसांनी केलाय. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी नागपुरातील "लोहारी सावंगा" गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गावातील सरपंचांसोबत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला होता. तेव्हा *काही महिला सरपंचांनी "श्रेष्ठ न्यूज" या नावाने परिसरातील अनेक महिला सरपंच आणि ग्रामसेवकांना फोन करून पैसे मागितले जात असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांसमोर केली होती.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nagpur
crime
Marathi Batmya