मध्यरात्री व्यापाऱ्याच्या घरासमोर मोठा थरार, 3.45 कोटींचा दरोडा टाकला अन् ड्रायव्हरला , नागपुरातील थरारक घटना
नागपूरच्या तुळशीनगर परिसरात मोठी लूट घडवून आणली आहे. तब्बल पावणे चार कोटी रुपये लुटारुनी लुटून नेल्याची माहिती
नागपुरात एका व्यापाऱ्याच्या घराजवळून लुटल्याची घटना घडली आहे. या व्यापाऱ्याची तब्बल 3.45 कोटी रुपयांची रोकड लंपास केली आहे. इतकंच नव्हे तर, चोरट्यांनी व्यापाऱ्याची कार पळवून नेल्याचंही समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागपूर पोलिसांकडून याचा चोरट्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
सुरेश परमार नावाच्या व्यापाऱ्याच्या घराजवळून त्यांच्या वाहन चालकाच्या ताब्यातून कार पळवून घेऊन जात अज्ञात लुटारूंनी तब्बल पावणेचार कोटींची रोकड लुटल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा सुरेश परमार यांचे वाहन चालक मोहन राव कार आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड घेऊन निघत असताना अज्ञात लुटारूंनी चाकूचा धाक धडकून कार पळवून नेली. नागपूर जिल्ह्याच्या खैरी भागात लुटारूंनी पळवून नेलेली कार सोडून देत त्याच्यातील रोकड सोबत नेल्याची माहिती आहे.
सध्या नागपूर पोलिसांचे विविध पथक लुटारूंचा शोध घेत आहे. लुटारुंनी व्यापारी सुरेश परमार यांच्या घरासमोरील गार्डला चाकूने जखमी केल्याची ही माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसारी, लुटारुंनी व्यापारी सुरेश परमार यांच्या घरासमोरील गार्डला चाकूने जखमी केल्याचीही माहिती आहे. तसंच, चोरी केलेली गाडी खैरी गावाजवळ सोडल्याचे पोलिस तपासात आढळले आहे. सुरेश परमार हे जालना येथील आहेत.
आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
महाराष्ट्रातसह देशभरातील महिला सरपंच आणि ग्रामसेवकांना टार्गेट करून खंडणी उकळणार्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश नागपूर ग्रामीण पोलिसांनी केलाय. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी नागपुरातील "लोहारी सावंगा" गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गावातील सरपंचांसोबत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला होता. तेव्हा *काही महिला सरपंचांनी "श्रेष्ठ न्यूज" या नावाने परिसरातील अनेक महिला सरपंच आणि ग्रामसेवकांना फोन करून पैसे मागितले जात असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांसमोर केली होती.