रोजंदारीवर काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या आईकडे मुलाने शाळेत जाताना 20 रुपये मागितले. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर काहीही न बोलता घराबाहेर पडलेल्या मुलाचा काही तासांतच गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना मंगळवारी नागपूर येथे सकाळी घडली.
नैतिक संजय दशमेर वय 13 आणि राहणार पथरई असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेने सर्वजण सुन्न झाले आहे. नैतिक हा पथरई येथील नवजीवन हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई मागील आठ दिवसांपासून मजुरीच्या कामासाठी आमडी येथे जात होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी नैतिक शाळेत जाण्यासाठी तयार झाला.
घराबाहेर पडताना त्याने आईकडे 20 रुपयांची मागणी केली. आईने पैसे कशासाठी हवेत, अशी विचारणा केली असता त्याने कारण सांगितले नाही. त्यामुळे आईने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर नैतिक काहीही न बोलता घरातून निघून गेला. सकाळी साडेअकराच्या सुमारास जवळील यांच्या शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला . ही बातमी समजताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत नैतिक आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविला. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले
याबाबत पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कुटूंबियानी सांगितले कीं मुलाला 20 रुपये न दिल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा त्यांचा अंदाज आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील अधिक तपास देवलापार पोलीस करीत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी आश्रमशाळेतील 14 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. राणू कृष्णा हलामीच्या मृत्यूने खळबळ एकच खळबळ उडाली आहे. काही तासांपूर्वी राणूला भेटायला पालक शाळेत आले होते. राणूला त्यांच्यासोबत घरी जायचे होते. मात्र हट्ट करणाऱ्या राणूला खोलीत कोंडल्याचा आरोप अधिक्षिकेवर करण्यात आलाय. घटना लक्षात आल्यावर राणूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला होता.