SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आईची सेवा करण्यासाठी आली अन् होत्याचं नव्हतं झालं, आईच्या प्रियकराचा 14 वर्षांच्या मुलीवर भयंकर अत्याचार

आईच्या कथित प्रियकराकडून 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. नागपूरच्या एका रुग्णालयातून आमिष दाखवून नेत जेवण देण्याच्या बहाण्याने आरोपीने मुलीला आधी लॉज आणि नंतर स्वतःच्या घरी नेले

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 14, 2026, 01:38 PM IST | Updated: Nov 14, 2026, 01:39 PM IST
Image Credit: Nagpur crime news 14 year old girl physically assaulted by her mother boyfriend
Join

नागपूरमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. आईच्या प्रियकरानेच 14 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे तर, आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

प्रसूतीसाठी दाखल असलेल्या आईची देखभाल करण्यासाठी डागा रुग्णालयात थांबलेल्या 14 वर्षीय मुलीवर तिच्या आईच्या कथित प्रियकराने बलात्कार केल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे. नागपूरच्या एका रुग्णालयातून आमिष दाखवून जेवण देण्याच्या बहाण्याने आरोपीने मुलीला आधी लॉज आणि नंतर स्वतःच्या घरी नेले.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने तिला जेवण देण्याचे आमिष दाखवून कॉटन मार्केट परिसरातील एका लॉजवर आणि नंतर स्वतःच्या घरी नेले, जिथे त्याने 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

गुन्हा कसा उघडकीस आला?

पीडित मुलगी मध्य प्रदेशातील तिच्या वडिलांच्या गावी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करण्याच्या इच्छेने रेल्वे स्थानकावर एकटीच भटकताना आढळल्यानंतर रेल्वे पोलिसांचे तिच्याकडे लक्ष गेले आणि त्यांनी तिची चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली.

मुलीचे आई-वडील विभक्त राहतात. तिचे वडील मध्य प्रदेशात राहतात, तर ती नागपुरात तिच्या आईसोबत राहते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली.

हा गुन्हा कॉटन मार्केट परिसरात घडल्याने हे प्रकरण गणेशपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे . फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे.

13 वर्षांच्या पुतणीवर काकाचा अत्याचार

नागपुरात नात्यात काका लागणाऱ्या एका नराधमाने 13 वर्षांच्या अल्पवयीन पुतणीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दवलामेटी येथे ही घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी आणि आरोपी काका हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असून मजुरीसाठी नागपुरातील दवलामेटी परिसरात शेजारी-शेजारी भाड्याच्या खोल्यांमध्ये राहतात. वाडी पोलिसांनी आरोपी काकाविरुद्ध 'पॉक्सो' आणि संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास वाडी पोलीस करत आहेत.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES