SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महिला संरपंचांना टार्गेट करायचे अन्...; फडणवीसांनी आदेश देताच नागपूर पोलिसांची कारवाई, दोन महिलाच चालवत होत्या रॅकेट

महाराष्ट्रातसह देशभरातील महिला सरपंच आणि ग्रामसेवकांना टार्गेट करून खंडणी उकळणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश. मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर कारवाई.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 18, 2026, 10:16 IST | Updated: Nov 18, 2026, 10:18 IST
Image Credit: Nagpur crime news Rural Police busted interstate gang that was extorting money from Sarpanchs
Join

महाराष्ट्रासह देशभरातील महिला सरपंच आणि ग्रामसेवकांना टार्गेट करून खंडणी उकळणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश नागपूर ग्रामीण पोलिसांनी केला आहे. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी नागपुरातील "लोहारी सावंगा" गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गावातील सरपंचांसोबत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला होता. तेव्हा काही महिला सरपंचांनी "श्रेष्ठ न्यूज" या नावाने परिसरातील अनेक महिला सरपंच आणि ग्रामसेवकांना फोन करून पैसे मागितले जात असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांसमोर केली होती. पहिला फोन आल्यानंतर महिला सरपंच आणि ग्रामसेवकांनी मागितलेले पैसे ऑनलाइन न पाठवल्यास ग्रामपंचायतीच्या कामात तुम्ही भ्रष्टाचार केला आहे, निधीची अफरातफर केली आहे, असे खोटे आरोप करत खंडणी उकळली जात असल्याचे ही महिला सरपंचांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते.

महिला सरपंचांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी नागपूर ग्रामीण पोलिसांना यासंदर्भात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे निर्देश दिले होते. नागपूर ग्रामीण पोलिसांनी सर्व प्रकरणाचा तपास करून मध्य प्रदेशातील भोपाळ मधून 35 महिलांना ताब्यात घेतले आहे. या महिलाच्या टोळीचे म्होरक्या मोनिका सूर्यवंशी आणि तिची बहीण नेहा सूर्यवंशी होत्या. दोघींनी भोपाळमध्ये परिसरात तीन कॉल सेंटर उभारून तिथून महाराष्ट्रातील महिला सरपंच आणि ग्रामसेवकांना फोन करून आधी जाहिरातीसाठी पैसे मागण्याचा, त्यानंतर गावातील विकास कामात भ्रष्टाचार केल्याचा खोटा आरोप करत खंडणी उकळण्याचा सपाटा लावला होता. त्यांची कार्यपद्धती अत्यंत धक्कादायक होती. महाराष्ट्रातील कोणत्या महिला सरपंच आणि ग्रामसेवकांना फोन करून खंडणी मागायची हे ठरवण्यासाठी ही टोळी महाराष्ट्र सरकारच्या "महापंचायत" पोर्टलचा वापर करून तिथून मोबाईल नंबर मिळवत होती.

महिल सरपंचांनी तक्रार केल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश मिळाल्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे नागपूर ग्रामीण पोलिसांनी ही टोळी भोपाळ मधून कार्यरत असल्याचे शोधून काढले. मंगळवारी भोपाळ मधील तिन्ही कॉल सेंटर मधून 35 तरुणींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे तब्बल 618 रजिस्टर सापडले असून त्यामध्ये भारतातील तब्बल 8 राज्यातील 50 हजार पेक्षा जास्त महिला सरपंच आणि ग्रामसेवकांचे नंबर व त्यांच्या ग्रामपंचायतीत कोणते विकास काम सुरू आहे. याचा मोठा डेटाबेस ही मिळाला आहे. पोलिसांनी तिन्ही कॉल सेंटर मधून 54 मोबाईल फोन, 2 लॅपटॉप, 2 कम्प्युटर, अनेक प्रिंटर यासह देशभरातील महिला सरपंच आणि ग्रामसेवकांचे नंबर आणि माहिती असलेले 618 रजिस्टर जप्त केले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES