• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नागपूर
  • /'2047 मध्ये भारताला इस्लाम राष्ट्र बनविण्यासाठी...', जाहीर सभेत नितेश राणेंचं विधान

'2047 मध्ये भारताला इस्लाम राष्ट्र बनविण्यासाठी...', जाहीर सभेत नितेश राणेंचं विधान

अभिनेत्री दिया मिर्झावर निशाणा साधण्याबरोबरच नितेश राणेंनी इंडिया आघाडीमधील पक्षांनाही लक्ष्य केल्याचं दिसून आलं. नितेश राणेंनी नेमकं जाहीर भाषणामध्ये काय म्हटलं आहे जाणून घ्या...

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 05, 2026, 07:01 AM IST|Updated: Nov 05, 2026, 07:25 AM IST
joinshare
'2047 मध्ये भारताला इस्लाम राष्ट्र बनविण्यासाठी...', जाहीर सभेत नितेश राणेंचं विधान
Image Credit: नागपूर येथील कार्यक्रमात नितेश राणेंचं भाष्य (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
सर्व चाचण्या उत्तीर्ण पण डोळ्यांत तिरळेपणा म्हणून पोलीस भरतीतून बाहेर काढलं; SC चा निर्णय उमेदवारांच्या कामाचा!

सर्व चाचण्या उत्तीर्ण पण डोळ्यांत तिरळेपणा म्हणून पोलीस भरतीतून बाहेर काढलं; SC चा निर्णय उमेदवारांच्या कामाचा!

2

ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा

3

मुंबईच्या लेकाने रणजी ट्रॉफीत पाडला धावांचा पाऊस! 400 धावांचा पराक्रम, कोण आहे चिन्मय सुतार?

4

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महामंडळाकडून दिवाळी बोनस जाहीर; प्रताप सरनाईकांची घोषणा

5

प्रायव्हेट फोटो, विवस्त्र डान्स, अंगभर लिपस्टिक अन् तासंतास...; शिवा शर्मा ठरला श्रद्धाच्या क्रूरतेचा बळी, धक्कादायक खुलासे समोर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

अभिनेत्री दिया मिर्झाच्या दिवाळीविषयक व्हिडीओवरुन नव्या वादाला तोंड फुटलेलं असतानाच आता या प्रकरणावरुन नितेश राणेंनी नागपुरमध्ये भाष्य केलं आहे. पत्रकारांशी बोलताना दियावर निशाणा सधतानाच जाहीर कार्यक्रमातील भाषणामध्ये नितेश राणेंनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला लक्ष्य केल्याचं दिसून आलं. 

जेवढी काळजी तिला हिंदू सणाची आणि पर्यावरणाची आहे तेवढीच...

पत्रकारांशी संवाद साधताना, "हा प्रश्न मुंबई महानगरपालिकेला विचारला गेला पाहिजे. माझ्याकडे त्याचे अधिकार नाहीत," असं म्हणत नितेश राणेंनी दिया मिर्झासंदर्भातील प्रश्नावर भाष्य करण्यास सुरुवात केली. याच प्रश्नाला उत्तर देताना, "दिया मिर्झा ही ईद, रमजान किंवा मोहरमच्या वेळी असे ट्विट करताना आम्हाला दिसली नाही. बकरी कापू नका त्यामुळे जनावरांना त्रास होतो, असं आवाहन दिया मिर्झा करताना आम्हाला कधी दिसली नाही. जेवढी काळजी तिला हिंदू सणाची आणि पर्यावरणाची आहे तेवढीच ईद, मोहरम आणि बकरी ईदच्या वेळी काळजी घेतली तर आम्हाला सर्वधर्मसमभाव असं कळेल," असा टोला नितेश राणेंनी लगावला. "सर्व सल्ला हिंदू धर्माच्या सणाबद्दल असेल तर त्याला  आक्षेप आहे. तिकडे बसलेले जबाबदार लोक हायकोर्टाच्या आदेशाचा आदर करतील. कधी करायचे ते आयुक्त किंवा महापौर हे सांगू शकतील," असं नितेश राणेंनी दियाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्यासंदर्भातील निर्णयावर भाष्य करताना म्हणाले.

बांगलादेश, नेपाळमध्ये काय झालं ते पहिलं ना?

पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर कार्यक्रमात भाषणादरम्यान नितेश राणेंनी, "आपल्या राष्ट्रांकडे कोणी वाकडी नजर करून कोणी पाहत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी आजची सभा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अराजकता पसरविण्याचे काम सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाकडे वाकड्या नजरेने बघितलं जात आहे. 2047 मध्ये भारताला इस्लाम राष्ट्र बनविण्यासाठी लढाई सुरू आहे," असा खळबळजनक दावा केला. "बांगलादेश, नेपाळमध्ये काय झालं ते पहिलं ना? एक दिवस भारतात वंदे मातरम, जय श्री राम बोलण्यापासून रोखले जाईल. राहुल गांधी, इंडीया आघाडीचे नेते रिजिम चेंज करायची बोलतात," असं म्हणत नितेश राणेंनी विरोधकांवर निशाणा साधला. 

अराजकता पसरविण्याचे प्रयत्न

भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगर यांच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत आयोजित ‘युवा शंखनाद’ कार्यक्रमादरम्यान नितेश राणे बोलत होते. आपल्या एकसंघ भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नये, यासाठी देशाचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी देशातील तरुणांवर आहे. आज काही समाजकंटकांकडून देशात अराजकता पसरविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही नितेश राणेंनी आपल्या भाषणात म्हटलं.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nitesh Rane
BJP