ऑक्टोबर महिन्यात साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर वातावरणात बदल जाणवतो. मात्र यंदा विदर्भात पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढला आहे. अमरावतीचा पारा 39.6 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिकांना दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून विशेषतः दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळही कमी होताना दिसत आहे. हवामान विभागाकडून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून दुपारी 11 ते 3 या काळात उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. त्यामुळे या वेळेत विनाकारण घराबाहेर पडणं टाळावं, तसेच उन्हात अधिक श्रमाचं काम करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका उन्हात काम करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. उकाड्यामुळे थकवा, अस्वस्थता आणि चिडचिड वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसं पाणी प्यावं, उन्हापासून बचाव करावा आणि शक्यतो दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर पडणं टाळावं, असा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, पुढील काही दिवसांत तापमानाचा हा चढता पारा कायम राहणार का, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच वाढलेल्या उष्णतेमुळे विदर्भात पुन्हा एकदा उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या ऑक्टोंबर हिटचा फटका सर्वाधिक कामगार आणि मजुरांना बसत असून त्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. तसेच या हिटमुळे सर्वसामान्य नागरिक ही हैराण झाले आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने रस्त्यांवरील वर्दळही कमी होत आहे. सततच्या उकाड्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता, थकवा आणि चिडचिड वाढत असल्याचे चित्र आहे. उन्हात काम करणाऱ्या नागरिकांना या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
शहर तापमान
अमरावती - 39.6
अकोला - 37.9
वर्धा -38.0
चंद्रपूर -37.0
नागपूर-36.2
बुलढाणा -36.0
वाशिम - 36