• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नागपूर
  • /'मी कारमध्ये पुढे बसू का...', अटकेनंतर श्रद्धा दुबेचे नखरे, पोलिसांना म्हणाली 'मागे बसले तर...', अधिकारी म्हणतो, 'तुम्ही केलं ते अगदी..', VIDEO व्हायरल

'मी कारमध्ये पुढे बसू का...', अटकेनंतर श्रद्धा दुबेचे नखरे, पोलिसांना म्हणाली 'मागे बसले तर...', अधिकारी म्हणतो, 'तुम्ही केलं ते अगदी..', VIDEO व्हायरल

शिवा शर्मा हत्या प्रकरणातील आरोपी श्रद्धा दुबे हिला नागपुरात अटक करण्यात आली आहे. तिच्या अटकेनंतरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पोलिसांना विचारताना दिसत आहे की, "मी पुढच्या सीटवर बसू शकते का? मागच्या सीटवर बसल्यावर मला गुदमरल्यासारखं होतंय".

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 21, 2026, 01:53 PM IST|Updated: Oct 21, 2026, 01:59 PM IST
joinshare
'मी कारमध्ये पुढे बसू का...', अटकेनंतर श्रद्धा दुबेचे नखरे, पोलिसांना म्हणाली 'मागे बसले तर...', अधिकारी म्हणतो, 'तुम्ही केलं ते अगदी..', VIDEO व्हायरल
Image Credit: 'मी कारमध्ये पुढे बसू का...', अटकेनंतर श्रद्धा दुबेचे नखरे

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कॅफे व्यावसायिक शिवा शर्मा हत्येप्रकरणी अखेर फरार असलेली आरोपी श्रद्धा दुबेला अटक करण्यात आली आहे. नागपुरातून उत्तर प्रदेश पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र अटक झाल्यानंतरही श्रद्धा दुबेचे नखरे काही कमी झालेले नाहीत. यावेळी पोलीसही तिला काहीशी कठोर वागणूक देताना दिसले नाहीत. हत्येच्या 11 दिवसांनंतर लखनौ पोलीस आणि उत्तर प्रदेश एसटीएफने नागपूर पोलिसांच्या मदतीने तीन आरोपींना अटक केली. यामध्ये श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि ड्रायव्हर दानिश यांचा समावेश आहे. दरम्यान तिच्या अटक होत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती एका पोलीस कर्मचाऱ्याला तुम्ही जे काही केले ते योग्यच आहे असे म्हणताना ऐकू येत आहे. यानंतर श्रद्धा पोलीस कर्मचाऱ्याला गाडीत मी पुढे बसू का? मागे बसल्यानंतर मला गुदमरल्यासारखं होतं असं सांगताना दिसत आहे.

'मागे बसल्यास श्वास घेण्यास त्रास होईल'

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक पोलिस दिसत आहेत. पोलीस श्रद्धा, रश्मी आणि दानिश यांना कारमध्ये बसवत आहेत. यावेळी पाठीमागे बसले तर श्वास घेण्यास त्रास होईल, असे श्रद्धा म्हणते. मी पुढे बसू शकते का? असेही ती विचारते. पण पोलीस त्यांना पटकन गाडीत बसून निघून जाण्यास सांगतात. मधेच पाणी आणि बसण्याची जागा या संदर्भात संवाद ऐकायला मिळतो.

 

11 दिनों तक श्रद्धा दुबे पुलिस को छकाती रही . पुलिस ढूंढ नहीं पाई, अफसरों पर गाज गिरी. फिर गिरफ्तारी हुई तो पुलिस का अंदाज देखिए. “तुमने जो किया ठीक किया”... वाह!, यह आरोपी की गिरफ्तारी है या उसके कारनामों का सम्मान समारोह? मैडम को पीछे बैठने में घुटन होती है, आगे बैठना है. मीडिया ने बदनाम कर दिया, इस पर भी पुलिस से हमदर्दी मिल रही है. सवाल श्रद्धा की सुविधा का नहीं, उस वर्दी की गरिमा का है, जो कानून की रखवाली के लिए है, आरोपियों की हौसलाअफजाई के लिए नहीं. शिवा शर्मा की मां इंसाफ का इंतजार कर रही है. यूपी पुलिस के आला अधिकारी बताएं- आरोपी से यह अपनापन किस बात का है? और अगर यही पुलिस का रवैया है, तो इंसाफ पर भरोसा कैसे कायम रहेगा? #ShraddhaDubey #shivacase

— Rana Yashwant (@RanaYashwant1) October 21, 2026

 

मीडिया तर काहीही दाखवतं

पोलीस कर्मचारी आणि श्रद्धा यांच्यातील आणखी एक संवाद व्हिडीओत ऐकू येत आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी म्हणतो की, प्रसारमाध्यमांनी तिची प्रतिमा पूर्णपणे मलीन केली आहे. श्रद्धाही या मताशी सहमत होते. तो अधिकारी पुढे म्हणतो की, प्रसारमाध्यमे काहीही दाखवू शकतात, पण शेवटी तो असेही म्हणतो की, "असो, तुम्ही जे केले ते योग्यच केले." यावर श्रद्धा उत्तर देते की, जर प्रसारमाध्यमांनी गोष्टी अशा प्रकारे मांडल्या नसत्या, तर परिस्थिती इथपर्यंत पोहोचलीच नसती. शेवटी, ते काही दहशतवादी तर नाहीत. त्यानंतर, गाडीत बसताना ती सांगते की, मागच्या सीटवर बसल्यामुळे तिला गुदमरल्यासारखे होत आहे; त्यावर तो अधिकारी तिला औषधांची सोय करून देण्याचे आश्वासन देतो.

उत्तर प्रदेश पोलीस एका हत्येच्या आरोपीशी इतक्या सौम्यपणे का वागत आहेत असा मुद्दा यानंतर उपस्थित होत आहे. दरम्यान, एडीजी (कायदा व सुव्यवस्था) अमिताभ यश यांच्या माहितीनुसार, अटकेपासून वाचण्यासाठी श्रद्धा बुरखा घालत असे. पकडले जाऊ नये म्हणून ती वारंवार आपली जागा बदलत असे. इतकेच नव्हे, तर प्रवासासाठी ती टॅक्सींचा वापर करत असे.

नेमकं प्रकरण काय?

9 ऑक्टोबर रोजी, लखनौच्या हजरतगंज परिसरातील 'अवध ग्रीन अपार्टमेंट्स'च्या चौथ्या मजल्यावरून पडून कॅफे मालक शिवा शर्मा यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी श्रद्धा दुबे, तिची बहीण आणि त्यांच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हापासून हे तिघेही फरार होते.

 

Add Zee News as a Preferred Source